जेजुरी रेल्वेस्टेशन मधील विकासकामांची वरिष्ठ अधिकारी पाहणी करणार – खा. सुळे यांनी जेजुरी, दौड ,आणि निरेतील रेल्वेस्थानकाच्या मांडल्या समस्या…
जेजुरी,दि.३० जेजुरी रेल्वेस्टेशन परिसरात सध्या सुरू असलेल्या विकासकामांच्या दर्जा व चुकीच्या राबविण्यात येणाऱ्या धोरणांबाबत सोमवारी (दि.३०) सकाळी ११वाजता पुणे विभागीय कार्यालयात खा. सुप्रिया सुळे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते .यामध्ये पुरंदर तालुक्यातील नीरा ,जेजुरी ,व दौड तालुक्यातील बोरीपार्धी येथील रेल्वे फाटक,बारामती -फलटण लोहमार्गावरील समस्या मांडण्यात येऊन त्या निवारण्याचे अनुषंगानेचर्चा व सूचना करण्यात आल्या .
यावेळी मंडल रेल प्रबंधक (विभागीय व्यवस्थापक )इंदू दुबे ,विभागीय अभियंता विकास कुमार ,उपविभागीय अभियंता मनीष कुमार ,अप्पर रेलवे प्रबंधक ब्रिजेशकुमार सिंह ,सुरक्षा आयुक्त उदयसिंह पवार ,वाणिज्य प्रबंधक मिलिंद हिरवे, सेंट्रल रेल्वे बोर्डाचे विभागीय सदस्य प्रवीण शिंदे , राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष माणिकमामा झेंडेपाटील ,दौड तालुका राष्ट्रवादी अध्यक्ष आप्पासाहेब पवार ,राष्ट्रवादी युवक अध्यक्ष पुष्कराज जाधव , माजी नगरसेवक तथा उद्योजक मेहबूबभाई पानसरे ,बापूराव भोर ,आदी अधिकारी -पदाधिकारी उपस्थित होते.
यामध्ये ,जेजुरी रेल्वेस्थानकाच्या समोर सांडपाणी वाहून जाण्यासाठी सध्या जी गटार योजनेचे काम सुरू आहे ,ते बंद पाईपलाईन भुयारी पद्धतीने व्हावे ,रस्त्याच्या कामाचा दर्जा सुधारावा ,लांब पल्ल्याच्या गोवा -निजामुद्दीन एक्स्प्रेस , गाडी क्र.१२७७९/१२७८० व यशवंतपूर अजमेर एक्स्प्रेस ,दादर -हुबळी एक्स्प्रेस क्र. १७३१७/१७३१८ आदी गाड्यांना जेजुरी येथे थांबा ध्यावा ,रेल्वे स्थानकाच्या उत्तरेकडील बाजूस उपमार्गावर असलेले स्क्रॅप त्वरित हटवावे ,आदी मागण्या यावेळी करण्यात आल्या ,तसेच रेल्वे विभागीय अभियंता,उपविभागीय अभियंता आदी संबंधित अधिकारी बुधवारी(दि.१)प्रत्यक्ष स्थळपाहणी करणार असल्याचे या बैठकीत ठरले त्यामुळे जेजुरी रेल्वेस्टेशन परिसरातील नागरिकांचे बुधवारी (दि.१) आमरण उपोषण स्थगित करण्यात आले आहे,
दौड तालुक्यातील बोरीपार्धी ,कडेठाण ,कानगाव ,गिरिम वायरलेस फाटा ते नांनवीज ट्रेनिंग सेंटर रस्ता आदी मोऱ्यांचे काम संथगतीने सुरू आहे.मोऱ्यांमध्ये पाणी साठते,तसेच काही ठिकाणी गेट बंद आहेत .त्यामुळे ही कामे द्रुतगतीने मार्गी लावावीत .बोरीपार्धी रेल्वे फाटकाच्या पश्चिमेला छोटा भुयारी मार्ग आहे.विद्यार्थी व पादचाऱ्यांना तो खुला करावा .आदी सूचना व मागण्या या बैठकीत करण्यात आल्या .