जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील इलेक्ट्रीक मोटारी चोरणारे दोघेजण गजाआड
जेजुरी, दि.३ जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील इलेक्ट्रीक मोटारी चोरणारे गजाआड करण्यात आले आहे. याबाबत जेजुरी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी प्रमोद गोरख जगताप (वय ३० वर्षे) व्यवसाय मोटार दुरूस्ती रा. जवळार्जुन ता. पुरंदर पुणे हे त्याचे मालकीचे दुकान बंद करून दिनांक २६/८/२२ रोजी रात्री ७/०० वा घरी गेले. त्यांनतर २७/८/२०२२ रोजी सकाळी ७/०० वा. सुमारास जवळार्जुन येथे जेजुरी मोरगाव रोड ब्रम्हवेतन्य हॉटेलसमोर असलेले मोटर दुरूस्तीचे दुकानाचे शटर उचकटुन आत प्रवेश करून दुकानातील दहा इलेक्ट्रीक मोटरी कॉपर वायर व रोख रक्कम असा एकुण ७३०००-०० रु. किमतीचे ऐवज कोणीतरी अज्ञात चोरटयांने चोरी करून नेलेबाबत तकार दिलेली होती. त्यावरून जेजुरी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करणेत आला.
सदरचा गुन्हा दाखल होताच पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, बारामती विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक मिलींद मोहीते, भोर उपविभागिय पोलीस अधीक्षक धंनजय पाटील, व जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर, याचे मार्गदशनाने जेजुरी पो.स्टे गुन्हे शोध पथकाचे पुंडलीक गावडे, पोलीस उपनिरीक्षक, सहा. फौजदार सी. डी. झेंडे पो हवा. बनसोडे, पो. कॉ. शेंडे, पो. कॉ महाडीक अशा टीमने गुन्हयाचा तपास सुरू केला.
तपासादरम्यान संशयित आरोपी १) सचिन उर्फ पप्पु सर्पत रोमन (वय ३५ वर्षे) रा. रोमनवाडी, ता. पुरंदर जि. पुणे,
तसेच २) पंजु रामदास धनगर उर्फ पवार (वय ४२ वर्षे) रा. सावरगाव पो. मादाळमोई ता. गेवराई जि. बीड, हल्ली रा. कुदळेमळा, यवत ता. दौड, जि. पुणे या दोघांवर यापूर्वी माघील काही वर्षांत अशाच प्रकारचे सहा सात गुन्हे दाखल असल्याचे निदर्शनास आले.
त्या दृष्टीने तपास सुरू करताना याच आरोपीनीच सदरचा गुन्हा केलेची माहीती मिळाली, आरोपी संशयितांना ताब्यात घेतले असता त्यांनी सदरचा गुन्हा केलेचे कबुल करून गुन्हयातील चोरीस गेलेल्या एकुण १० इलेक्ट्रीक मोटारी जप्त करन्यात आल्या आहेत. तसेच त्यांनी गुन्हयात वापरलेली दुचाकी मोटार सायकल सी. डी. डॉन ही देखील चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले असुन ती मोटार सायकल त्यांनी केडगाव चौफुला येथे चोरल्याचे कबुल केले आहे. त्याबाबत यवत पो.स्टे येथे गुन्हा नोंद आहे. आरोपीनी वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यातील एका गुन्हयाची कबुली दिली आहे. त्यादृष्टीने त्याचेकडे तपास सुरू आहे. आरोपींनी आणखी काही गुन्हे केल्याची शक्यता असुन त्याचेकडे त्यादृष्टीने तपास सुरू आहे.
सदर गुन्हयाचा पुढील तपास जेजुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक उमेश तावसकर पोलीस हवालदार बनसोडे हे करीत आहे.