जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्य व शहीद सैनिक कुटुंबाचा सन्मान….
जेजुरी,दि. १६ स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आणि माझी माती माझा देश या उपक्रमांच्या अनुषंगाने १५ऑगस्ट स्वातंत्र्य दिनानिमित्त जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने स्वातंत्र्य सैनिक व शहीद सैनिकांच्या कुटुंबियांचा सन्मान करण्यात आला.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने दि १५ रोजी जेजुरी पोलीस स्टेशन आवारात सन्मान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नीरा येथील स्वातंत्र्य सैनिकांचे कुटुंबीय शांताबाई नारायण घोलप, सीताबाई रामचंद्र गायकवाड,जेजुरी येथील कै हिराबाई प्रल्हाद सातभाई यांचे कुटुंबीय चंद्रकांत सातभाई,शहीद शंकर शिंदे यांच्या पत्नी छाया शिंदे,शहीद चंद्रकांत टेकवडे यांचे वडील ज्ञानोबा टेकवडे या कुटुंबियांचा सन्मान जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर,उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर,पुंडलिक गावडे,राहुल साबळे, पोलीस हवालदार गणेश दाभाडे, गणेश गव्हाणे, केशव जगताप,संतोष मदने, रुपेश नावडकर,आण्णासाहेब देशमुख ,गणेश नांदे,विनायक हाके ,तात्यासाहेब खाडे उपस्थित होते.