जेजुरी पोलिसांचा वेश्या व्यवसाय करणाऱ्या लॉजवर छापा. तिघांवर कारवाई…
जेजुरी, दि.१७ जेजुरी पोलीस स्टेशन हद्दीतील जेजुरी सासवड रस्त्यावर तक्रारवाडी जवळ असणाऱ्या लक्ष्मी नारायण लॉजवर अनैतिक वेश्या व्यवसाय सुरू होता .जेजुरी पोलिसांनी या लॉजवर छापा मारून वेश्या व्यवसाय करून घेणारे तिघेजण व वेश्या व्यवसायासाठी आणलेल्या दोन महिलांवर कारवाई केली.
आरोपी - १) रमा मुगवेर ,२) रविश केशव देशभंडारी ( वय २८ वर्षे ) रा.सी/४०८,संदीप गार्डन वाय.के.एन.एक्स. १०० फुटी रोड,बोलिंग ठाणे सध्या रा.लक्ष्मीनारायण लाँजिंग अँन्ड बोर्डींग रेस्टाँरंट,तक्रारवाडी ता पुरंदर जि. पुणे ३) परमेश्वर नागप्पा शेटगुंडे वय ३९ वर्षे रा.पांडूरंग गल्ली, वागदरी ता. अक्कलकोट जि. सोलापूर सध्या रा.लक्ष्मीनारायण लाँजिंग अँन्ड बोर्डींग रेस्टाँरंट,तक्रारवाडी ता.पुरंदर जि. पुणे यांच्यावर जेजुरी पोलिसांनी अनैतिक मानवी वेश्या व्यवसाय प्रतिबंध कायदा १९५६ चे कलम ३,४,५, सह भा.द.वि.क.३४ नुसार कारवाई केली आहे.
या प्रकरणी जेजुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जेजुरी सासवड रस्त्यावरील तक्रारवाडी नाजिक लक्ष्मी नारायण लॉज व हॉटेल असून या ठिकाणी अनैतिक वेश्या व्यवसाय केला जात असल्याची माहिती जेजुरी पोलिसांना मिळाली होती .त्यानुसार जेजुरी पोलिसांनी सोमवार दिनांक १६ रोजी रात्री साडे आठ वाजण्याच्या सुमारास लक्ष्मी नारायण लॉजवर बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला असता येथील मॅनेजर व त्याचा कामगार दोन महिलांकडून संगममताने वेश्या व्यवसाय करवून घेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी व्यवसाय करवून घेणाऱ्या तिघांवर गुन्हे दाखल केले आहेत.
पोलिस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राहुल साबळे, पोलिस उपनिरीक्षक पुंडलीक गावडे, महीला पोलिस उपनिरीक्षक रुपाली पवार , पोलीस कर्मचारी गणेश नांदे, प्रविण शेंडे, गणेश गव्हाणे, योगेश चितारे, विनायक हाके यांनी केली