जेजुरी पालिकेची कर वसुली करणार महिला बचत गट ….नागरिकांनी सहकार्य करावे- मुख्याधिकारी चारुदत्त इंगोले
जेजुरी, दि.१९ जेजुरी नगरपालिकेच्या वतीने सन २०२२ – २३ या वित्तीय वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी करांची मागणी बील वाटप करणे व करांची वसुली करण्याचे काम सुरु झाले असून हे काम महिला बचत गटा मार्फत करण्यात येणार आहे .या बाबत जेजुरी नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जेजुरी नगरपालिकेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांनी केले आहे.
दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियाना अंतर्गत जेजुरी शहरातील मालमत्ता धारकांचे सन २०२२ – २३ या वित्तीय वर्षातील घरपट्टी व पाणीपट्टी करांची मागणी व वसुली करण्याचे काम महिला बचत गटांकडे देण्यात येणार आहे. सदरचे काम करणाऱ्या महिलांना जेजुरी नगरपरिषदेच्या मार्फत ओळखपत्र देण्यात येणार आहे. जेजुरी शहरातील मालमत्ता धारकांनी बिल वाटप आणि करांची वसुली करण्या करीता बचत गटातील महिलांना सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी यांनी केले आहे.