जेजुरी परिसरात विजांचा गडगडाट, वीज पडली, नुकसान नाही…
जेजुरी,दि.७ जेजुरी व परिसरात सोमवारी (दि.६) रात्रीपासून ढगाळ वातावरण होते तर मंगळवारी (दि.७) विजेच्या प्रचंड कडकडाटासह , हलकासा पाऊस पडला .कधी ऊन तर कधी ढगाळ वातावरण यामुळे हाता तोंडाशी आलेली गहू ,कांदा ,हरबरा पिके धोक्यात येण्याची शक्यता असल्याने बळीराजा चिंतेत पडला आहे.
शेताच्या बांधावर वीज पडली ,जीवित हानी नाही,
जेजुरी शहराच्या दक्षिण दिशेला कडेपठार डोंगरानजीक असणाऱ्या पवारवाडीमध्ये भरत पवार यांच्या शेताच्या बांधावर मोठा कडकडाट होत वीज पडली. यावेळी मोठा आवाज आणि धूर निघाला असल्याचे पवार यांनी सांगितले सुदैवाने जीवित व वित्त हानी नाही .मात्र ज्या ठिकाणी वीज पडली तेथे फूट -दीड फुटांचा खड्डा पडला होता.ही घटना मंगळवारी (दि.७ ) सकाळचे सुमारास घडली.