जेजुरी देवसंस्थान कमिटीवर स्थानिक विश्वस्त नियुक्त करावेत – खासदार सुप्रिया सुळे
जेजुरी,.२९ महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या सेवेच्या माध्यमातून देवाची निस्सीम भक्ती ,आणि सेवेची जवाबदारी ग्रामस्थ पूर्ण करीत असतात.ही संस्कृती पुढे जतन करण्यासाठी जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्त पदी स्थानिक व्यक्तींनाच संधी मिळाली पाहिजे,अन्यथा आंदोलनाचा मार्ग बदलावा लागेल असा इशारा खासदार सुप्रिया सुळे यांनी दिला.
जेजुरी देवसंस्थान कमिटीवर जेजुरीचे स्थानिक विश्वस्त नेमावेत या मागणीसाठी धरणे आंदोलन सुरू केले आहे.या आंदोलनाला सोमवार २९ रोजी सायंकाळी खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट दिली,यावेळी ग्रामस्थांशी चर्चा केली.ग्रामस्थांच्या वतीने त्यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या की, कुलदैवत खंडोबा देवाचे मंदिर जेजुरीत आहे,जेजुरी तील प्रत्येक नागरिकाचे देवाशी भक्तीचे नाते आहे, यात्रा जत्रा, सण उत्सव,रुढी परंपरा ग्रामस्थांनी जतन केली आहे. असे असताना स्थानिक व्यक्तींना विश्वस्त पदाची संधी दिलीं गेली नाही.सात पैकी पाच विश्वस्त जो पर्यंत स्थानिक नियुक्त केले जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरू राहील,मी ही या आंदोलनात सहभागी राहील, राजकारण विरहित आंदोलन केले जाईल,वेळ पडली तर मुख्यमंत्री व उपमुख्यंत्री यांना भेटून विनंती करण्यात येईल असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुक्यातील पदाधिकारी संभाजीराव झेंडे, सुदाम आप्पा इंगळे, हेमंतकुमार माहुरकर,माणिकराव झेंडे पाटील,पुष्पराज जाधव,विराज काकडे,जयदीप बारभाई,तानाजी जगताप, राहुल घाडगे व मोठ्या संख्येनं जेजुरी कर आंदोलक उपस्थित होते.
दरम्यान, जेजुरीतील ग्रामस्थ व आंदोलकांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांची ही बारामती विद्या प्रतिष्ठान येथे भेट घेऊन निवेदन देण्यात आले. यावेळी अजित पवार यांनी याबाबत मी स्वतः लक्ष घालणार असल्याचे आश्वासन दिले आहे