जेजुरी ज्येष्ठ नागरिक संघाकडून दीडशे महिलांना साड्या वाटप करून सन्मान…
जेजुरी, दि.२२ जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जेजुरी येथील जयमल्हार ज्येष्ठ नागरिक संघाच्या वतीने जेजुरी शहरातील दीडशे कामगार व कष्टकरी महिलांचा साड्या वाटप करून सन्मान करण्यात आला. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून दरवर्षी ज्येष्ठ नागरिक संघ,महिलांसाठी विविध शिबिरे, व्याखाने,व सन्मान कार्यक्रमाचे आयोजन केले जाते.
नुकत्याच झालेल्या कार्यक्रमात शहरातील नगराध्यक्षा वीणा सोनवणे,माजी प्राचार्य व व्याख्याते डॉ नारायण टाक यांच्या हस्ते दीडशे महिलांचा साड्या वाटप करून सन्मान करण्यात आला. यावेळी वीणा सोनवणे,डॉ नारायण टाक,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामकाका पेशवे,उपाध्यक्षा उषा आगलावे यांनी महिलांना मार्गदर्शन केले. राजमाता जिजाऊ,पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर,यांचा आदर्श महिलांनी घेवून राष्ट्र हितासाठी प्रयत्न करावा असे आवाहन यावेळी डॉ. नारायण टाक यांनी केले.
ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष शामकाका पेशवे यांनी संघाला ५१ हजार रुपयांची देणगी दिली तसेच ज्येष्ठ नागरिक भवन परिसरात पाण्यासाठी बोअर घेवून पाण्याची अडचण दूर केली. संघाच्या वतीने सर्व महिलांना भोजनाची व्यवस्था करण्यात आली.
यावेळी संघाचे पदाधिकारी रमेश देशपांडे,अनंत जगताप,विलास घोणे,ज्ञानेश्वर भोईटे गुरुजी,म्हेत्रे गुरुजी,सोनवणे गुरुजी,हरपळे गुरुजी,दिलीप साळुंखे,माणिक पवार, मुकुंद दीड भाई, हभप सयाजी मोहरकर ,जेजुरी शहर भाजपाचे अध्यक्ष सचिन पेशवे, कार्याध्यक्ष गणेश भोसले आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव मोहिनी धोत्रे,सूत्रसंचालन पांडुरंग कोरपड,तर आभार हरिश्चंद्र कोरपड यांनी मानले.