जेजुरी ग्रामीण रुग्णालय उदघाटन वाद…………… जालिंदर कामठे, विजय कोलते सह चार जण निर्दोष..
जेजुरी, दि.२५ सण २०१८ साली जेजुरी ग्रामीण रुग्णालय उदघाटनाच्या वाद निर्माण झाल्याने पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष, सद्या भाजप चे नेते असणारे जालिंदर कामठे, जिल्हा परिषदेचे दुसरे माजी अध्यक्ष विजय कोलते, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष माणिक झेंडे पाटील, पुरंदर पंचायत समितीचे माजी उपसभापती निलेश जगताप, जेजुरीचे माजी उपनगराध्यक्ष गणेश निकुडे, माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता. राजकीय भावनेने दाखल करण्यात आलेला हा गुन्हा कोणत्याही निकषावर न टिकल्याने दि.२३ मे रोजी जिल्हा सत्र न्यायालयाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली आहे.
डिसेंबर २०१८ मध्ये जेजुरीतील ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन कार्यक्रम तत्कालीन राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतला होता. या कार्यक्रमात खा.सुप्रिया सुळे यांना डावलण्यात आले होते. त्या निषेधार्थ जालिंदर कामठे यांच्या नेतृत्वाखाली यांनी आंदोलन केले होते. त्यांनी उदघाटन कार्यक्रमाच्या आदल्याच दिवशी ग्रामीण रुग्णालयाचे उदघाटन केले होते. याचा राग मनात धरून विजय शिवतारे सत्तेचा दुरुपयोग करून आमच्यावर ग्रामीण रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधिकारी नामदेव शिंदे यांना या सहा जणांवर गुन्हे दाखल करावयास भाग पाडले होते. त्यानंत काही दिवसात वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक धक्क्याने निधन झाले होते. मात्र भारतीय दंड विधान ३५३,४५२,३४ व मुंबई पोलीस कलम १३५ नुसार दाखल झालेला गुन्ह्याचे चार वर्षे प्रक्रिया सुरू होती. राजकीय भावनेने आम्हाला चार वर्षे जिल्हा सत्र न्यायालयात हेलपाटे मारावे लागले होते. राजकीय द्वेषापोटी दाखल झालेला हा गुन्हा कोर्टात टिकला नाही. जिल्हा सत्र न्यायाधीश एस.जी.वेदपाठक यांनी हा गुन्हा निकाली काढीत सहा जणांची गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली आहे.
अनेक वर्षे सामाजिक काम करीत असताना आमच्या सारख्या कार्यकर्त्यांना राजकीय सूड भावनेने विनाकारण न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्याचा प्रसंग, तत्कालीन अधिकाऱ्यांवर सत्तेचा दबाव टाकून विजय शिवतारे यांनी आणला होता. अशा पद्धतीने सत्तेचा गैर वापर करणाऱ्या प्रवृत्तीचा आम्ही निषेध करीत असल्याचे विजय कोलते यांनी सांगितले. यावेळी माणिक झेंडे पाटील, गणेश निकुडे आणि हेमंत सोनवणे उपस्थित होते.