जेजुरी गडाला सोन्याची झळाळी, देवा तुझी सोन्याची जेजुरी
जेजुरी, दि.२६ अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीत षडरास्त्रोत्सव सुरू आहे. देवाचे मानकरी, सेवेकरी तसेच पुजारी वर्गाने संपूर्ण गडकोटाला विद्युत रोषणाई केली आहे. संपूर्ण शहरात धार्मिक कार्यक्रम सुरू आहेत.घराघरात घट स्थापना करण्यात आलेली आहे. जेजुरी गडावर ही विविध धार्मिक, कुलधर्म कुळाचाराचे कार्यक्रम सुरू आहेत.
गडकोटात विद्युत रोषणाई केल्याने जेजुरी गडाला सोन्याची झळाळी आली असून देवा तुझी सोन्याची जेजुरी असाच भास होत आहे.