जेजुरी गडाला येनार मूळ स्वरूप. बदलणार चेहरा मोहरा…..
जेजुरी, दि. २३ ( बी एम काळे ) महाराष्ट्राचे कुलदैवत, बहुजनांचे लोक दैवत असणाऱ्या तीर्थक्षेत्र जेजुरीसाठी सुमारे ३४९ कोटी ४५ लक्ष रुपयांचा श्री क्षेत्र जेजुरी गड विकास आराखड्यास सण २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात मंजुरी देण्यात आली आहे. त्यानुसार आज जेजुरीगडावर पहिल्या टप्प्यातील पहिला भागात होणाऱ्या विकास कामे सुरु आहेत. तीर्थक्षेत्र जेजुरीच्या विकासासाठी पहील्यांदाच एवढा मोठा निधी उपलब्ध झाल्याने जेजुरीकरांबरोबरच भाविकांतून समाधान व्यक्त होत आहे. सुमारे अडीचशे वर्षानंतर जेजुरी गडाच्या एवढ्या मोठ्या प्रमाणावर जीर्णोद्धार होताना दिसत आहे.
तीर्थक्षेत्र जेजुरीचा सर्वांगाने विकास व्हावा, येथे येणाऱ्या भाविकांना सुलभ व समाधानाने कुलदैवताचे दर्शन व्हावे अशी मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती. त्या मागणीला आता मूर्त स्वरूप येणार आहे. तीर्थक्षेत्र जेजुरीगड व परिसराचा सर्वार्थाने आता विकास होऊ लागला आहे. पुढील दोन तीन वर्षात जेजुरीचा संपूर्ण चेहरा मोहराच बदलून जाणार आहे.
महाराष्ट्र शासनाने जेजुरीचा विकास करण्यासाठी श्री क्षेत्र जेजुरी गड तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार केला आहे या आराखड्यात अंतर्गत पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली एक जिल्हास्तरीय समिती घटित करण्यात आली आहे या समितीच्या अंतर्गत पुण्याचे जिल्हाधिकारी सनियंत्रण अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली या संपूर्ण विकास आराखड्यातील कामांची देखभाल अंमलबजावणी होणार आहे. त्यासाठी स्वतंत्र कर्मचारी ही उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.
नुकताच दि. ७ ऑगस्ट रोजी झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमातच राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला आहे.
सनियंत्रण अधिकारी तथा जिल्हाधिकाऱ्यांनी पुरातत्व विभागाच्या परवानगीने जेजुरी गडावरील विकासकामांना सुरुवात केली आहे. आज जेजुरी गडाच्या संपूर्ण तटबंदी, आतल्या ओवऱ्यांचे दगडांचे क्लिनिंग सुरू आहे. तर मुख्य गाभाऱ्यातील दगडांना मूळ स्वरूप देऊन सुशोभीकरण केले जात आहे. संपूर्ण गडकोट हा मूलस्वरूपात दिसणार आहे.
आराखड्यानुसार जेजुरी गड व परिसराचा संपूर्ण विकास तीन टप्प्यात करण्यात येणार आहे. या विकास आराखड्यानुसार पहिल्या टप्प्यात भाग १ मधून मुख्य खंडोबा मंदिर आणि इतर सहाय्यक संरचनासह संपूर्ण तटंबंधीचे जतन व दुरुस्ती करण्यात येणार आहे यासाठी ११ कोटी २२ लक्ष ९६ हजार ७३३ रुपयांची तरतूद करण्यात आली आहे तर मंदिरावरील व पायरी मार्गावरील दीपमाळांची जतन व दुरुस्तीसाठी ११ कोटी ३५ लाख २५ हजार ४३१ रुपये आणि १२ कोटी २७ लाख ४४ हजार ७९३ रुपयांची तरतूद आहे त्याचबरोबर होळकर तलाव पेशवे तलाव आणि इतर जलकुंड तसेच पायऱ्या असलेल्या शहरातील विहिरी यांचे जतन व दुरुस्तीसाठी अकरा कोटी ८९ लाख ५१ हजार ७९८ रुपयांची तरतूद आहे कडेपठार येथील खंडोबा मंदिर आणि इतर सहाय्यक संरचना यांचे जतन दुरुस्ती करण्यासाठी १२ कोटी ५६ लाख २३ हजार १३६ रुपये आणि शहरातील पुरातन मंदिरांचे जतन व दुरुस्ती त्याचबरोबर मल्हार गौतमेश्वर मंदिर लवथळेश्वर मंदिर व बल्लाळेश्वर मंदिर यांच्यासाठी दोन कोटी दोन लाख ९९ हजार ५८५ रुपये आणि कडेपठारच्या दिशेने जाणाऱ्या दोन्ही मार्गांच्या बाजूच्या संरचना पायऱ्यांचे जतन व दुरुस्ती करण्यासाठी १० कोटी ७३ लाख ८२ हजार ६४२ रुपये तरतूद आहे यामध्ये तीन कमानी दोन वापरात असलेल्या आणि एक बानुबाई मंदिराजवळील यांचा समावेश आहे यानंतर टप्पा क्रमांक एक या दुसऱ्या भागामध्ये परिसराचा विकास करण्यात येणार आहे यामध्ये मूलभूत पाया सुविधा विद्युत सोयी पाणीपुरवठा घनकचरा व्यवस्थापन मन निसारण आणि पाण्याचा पुनर्वापर योग्य वायू विजन प्रणाली मंदिर परिसरातील धूळ गोळा करण्यासाठी संत्री आणि घनकचऱ्याचे व्यवस्थापन करण्यासाठी सुमारे पाच कोटी १९ लाख ३२७ रुपयांची तरतूद शासनाकडून करण्यात आली आहे भाविकांसाठी सोयी सुविधा यामध्ये दिव्यांग लोकांसाठी सुविधा चाकाची खुर्ची, कक्ष वेगळा मार्ग आधी सह काम केले जाणार आहे मंदिरातील कर्मचाऱ्यांच्या सुविधा विश्वस्त व पाहण्यासाठी बसण्याची व्यवस्था, माहिती व चौकशी कक्ष पुजारी सेवेकऱयांसाठी व्यवस्था, रोजचे सामान ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था गर्दीचे व्यवस्थापन, आपत्कालीन व्यवस्थापन, आदीसाठी सुमारे १२ कोटींची तरतूद आहे या संपूर्ण टप्प्याच्या विकासासाठी शासनाकडून १०९ कोटी ५७ लाख ९६ हजार ७० रुपये मंजूर करण्यात आले असून या विकास कामाची कामे आता युद्धपातळीवर सुरू आहेत
जेजुरी खंडोबा गड, आणि शहरातील विविध विकास कामे सुरू झालेली आहेत. जेजुरीतील मधील सर्व धार्मिक व ऐतिहासिक स्मारकांचे जतन दुरूस्तीचे काम नियोजनबद्ध केले जाणार आहे.ही कामे सण २०२५ अखेर पूर्ण करण्याचे नियोजन केलेले आहे. यादरम्यान भाविकांची गैरसोय होणार नाही याची काळजी घेतली जाणार आहे तरी या कामादरम्यान थोडीफार गैरसोय झालीच तरी ही सर्वानी सहकार्य करावे असे आवाहन पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने यांनी केले आहे.
—––—————————————
अडीचशे वर्षानंतर कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी गडाचा एक प्रकारे जीर्णोद्धार होत आहे. याचा सर्वांनाच मोठा आनंद होत आहे. जेजुरी गड नव्या रुपात समोर येणार आहे . यातील मुख्य प्रश्न आहे तो मुख्य गाभाऱ्याचा ते काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे.
पुढील महिन्यात २४ ऑक्टोबर रोजी दसरा उत्सव आहे. १५ ऑक्टोबर रोजी घटस्थापना होत आहे.त्यापूर्वी मंदिरातील गाभाऱ्याचे काम पूर्ण होणार आहे. तोपर्यंत भाविकांना थोड्या असुविधा राहतील मात्र ग्रामस्थ, भाविक, पुजारी सेवेकाऱ्यांनी सहकार्य करावे असे आवाहन मार्तंड देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे यांनी केले आहे