जेजुरी औद्योगिक क्षेत्रात तीन महिन्यात भारत फोर्ज चे काम सुरू करणार- बाबासाहेब कल्याणी, संभाजी ब्रिगेडला आश्वासन
तीन महिन्यात जेजुरीत भारत फोर्ज काम सुरू- बाबासाहेब कल्याणी
जेजुरी, दि. २५ येत्या तीन महिन्यात जेजुरी औद्योगिक क्षेत्रात भारत फोर्ज चा नवीन प्लांट उभारणीचे काम सुरू करू असे आश्वासन कंपनीचे मालक प्रसिद्ध उद्योजक बाबासाहेब कल्याणी यांनी संभाजी बिग्रेड कार्यकर्त्यांना दिले आहे.
प्रसिद्ध उद्योजक भारत फोर्ज चे मालक बाबासाहेब कल्याणी हे खंडोबा देव दर्शनासाठी जेजुरीत आले होते. यावेळी मार्तंड देव संस्थान चे विश्वस्त व संभाजी ब्रिगेड चे शहराध्यक्ष संदीप जगताप, जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी त्यांचे स्वागत केले. यावेळी त्यांना ब्रिगेड च्या वतीने जेजुरी औद्योगिक क्षेत्रात भारत फोर्ज च्या माध्यमातून मोठा उद्योग सुरू करावा
ज्यामुळे रोजगार निर्मितीत मोठी भर पडेल असे निवेदन देण्यात आले. कल्याणी यांनी ही पुढील तीन महिन्यात येथे उद्योग उभारणी ला आपण सुरुवात करू असे आश्वासन दिले.
यावेळी उद्योजक रत्नसिंह सावंत, ब्रिगेडचे कार्यकर्ते, तसेच मनोज शिंदे, महेश उबाळे, विकास पवार, सतीश घाडगे आदी उपस्थित होते.