जेजुरीनगरीची ग्रामदेवता जानाईदेवी पालखी सोहळ्याचे निवकनेकडे प्रस्थान..
जेजुरी, दि २२ कुलदैवत श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची जागृत ग्रामदेवता आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असणाऱ्या जानाई देवीचा पायी पालखी सोहळा जेजुरीतून अतिशय उत्साहात सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील निवकनेकडे आज दि.२२ रोजी सायंकाळी मार्गस्थ झाला.
जानाई देवींचा पालखी सोहळ्याला महाशिवरात्री दिवशी प्रारंभ झाला. जानाई पालखी सोहळ्याचे मुख्य मानकरी नागनाथ झगडे यांच्या निवासातून देवीची पालखी काढण्यात आली. जेजुरी गडावर खंडोबा देवाची भेट घेवून शहरातून मिरवणूक काढून पालखी मेंडके वाड्यात ठेवण्यात आली.येथे चार दिवस देवीचा जागर भजन कीर्तन आदी धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. बुधवार दि २२ रोजी सकाळी देवीचे मानकरी व ग्रामस्थांनी देवींची महापूजा,अभिषेक केला. दुपारी साडे तीन वाजता मेंडके वाड्यातून वाजत गाजत पालखी सोहळा सुरु झाला. ग्रामस्थांनी सडा रांगोळी घालून सोहळ्याचे औक्षण केले. त्यांनतर सुमारे चार किलो मीटर हजारो भाविक पालखी सोहळ्या बरोबर पायी शिवखिंडीत आले. शिवखिंडीत देवीची परडी पूजन व समाज आरती झाली .परडी पूजना नंतर जानाई देवी पालखी सोहळा निवकनेकडे मार्गस्थ झाला.
दि.२२ रोजी पालखी सोहळ्याचा मुक्काम कामठवाडी येथे असून दि २३ रोजी नीरा नदीवर शाही स्नान होवून सालपे येथे मुक्कम,दि २४ रोजी वडूथ दि.२५ रोजी माहुली येथे अभिषेक कृष्णा नदीचे ओटी भरण,परडी पूजन व मुक्काम,दि २६ रोजी तारळे मुक्काम,दि २७ रोजी कावदरा येथे निसर्ग पूजन होवून सोहळा निवकने येथे पोहोचणार आहे. मंगळावर दि.२८ रोजी मुख्य यात्रेदिवशी क्षेत्र धारेश्वर येथे देवी स्नान निवकने येथे मुख्य यात्रेनिमित्त महापूजा अभिषेक व सुमारे पन्नास हजार भाविकांना महाप्रसाद ,छबिना आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. दि १ रोजी देवीचा चौक फुटून यात्रेची सांगता होवून परतीच्या प्रवासाला सुरुवात होणार आहे.
या पालखी सोहळ्याचे नियोजन श्री,जानाईदेवी पालखी पदयात्रा अन्नदान सेवा ट्रस्ट तसेच जानाईभक्त नागू माळी ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे. या पायी सोहळ्यात सहभागी झालेल्या भाविकांना जीवन नाष्टा,पाणी आरोग्य सुविधा ट्रस्टच्या वतीने पुरविण्यात आल्याचे श्री जानाई देवी पालखी सोहळ्याचे शिवाजी कुतवळ,तसेच जानाई भक्त नागू माळी ट्रस्टचे प्रमुख नागनाथ झगडे यांनी सांगितले.
फोटो मेल केले आहेत.