शिवरायांबद्दल बेताल वक्तव्य करणाऱ्यांचा जेजुरीत निषेध राज्यपाल हटवण्याची मागणी…
जेजुरी ,दि .९ छत्रपती शिवरायांबाबत बेताल वक्तव्य आणि चुकीचा इतिहास मांडणाऱ्या राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी करीत ना.मंगलप्रभात लोढा ,भाजपाचे प्रवक्ते सुधांश त्रिवेदी ,आमदार प्रसाद लाड यांचा जेजुरी पंचक्रोशीतील शिवप्रेमी व संभाजी ब्रिगेड च्या वतीने आज निषेध करण्यात आला.
गुरुवारी (दि.८) सकाळी ११ वाजता
शहरातील मुख्य छत्रपती शिवाजी महाराज चौकात निषेध सभा घेण्यात आली. यावेळी, ज्यांना महाराष्ट्राच्या संत परंपरेची व महापुरुष – राष्ट्रपुरुषांच्या जाज्वल्य इतिहास व पराक्रमाची माहिती व अभ्यास नाही.अशा राज्यपाल भगतसिंग कोशारी यांची तत्काळ हकालपट्टी करावी .अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे शहराध्यक्ष संदीप जगताप यांनी मागणी केली. तसेच येत्या १३ तारखेला पुणे बंदच्या आवाहनात जेजुरीकर सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. छत्रपती शिवरायांचा चुकीचा व खोटा इतिहास मांडणारा हर हर महादेव आणि वेडात दौडले वीर सात हे चित्रपट महाराष्ट्रात कोठेही प्रदर्शित होऊ दिले जाणार नाही असा इशारा शिवव्याख्याते निलेश जगताप यांनी दिला. विचारांची लढाई विचारांनी व्हावी. सावरकरांवर कोणी वैचारिक मांडणी केली म्हणून त्याला प्रत्युत्तर देताना छत्रपती शिवाजी महाराज यांचेवर बेताल आणि चुकीचे करणे चुकीचे आहे. ही प्रवृत्ती ठेवण्याचे काम संभाजी ब्रिगेड निश्चितपणे करेल.असे संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष अजयसिंह सावंत यांनी सांगितले .यावेळी विरोधी पक्षनेते जयदीप बारभाई ,गटनेते सचिन सोनवणे, उद्योजक मेहबूब पानसरे,बापू भोर ,वंदना जगताप, रसिक जोशी आदींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी शिवाजी जगताप,आकाश शिळीमकर ,संतोष बयास ,विक्रम शिंदे,सचिन हंबीर,मंगेश शेवाळे,रमेश शेरे ,सचिन हरपळे, अमीर बागवान ,सलीम तांबोळी ,आदींसह शिवप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक नंदकुमार सोनवलकर ,पोलीस कर्मचारी आण्णा देशमुख यांना निवेदन देण्यात आले.