जेजुरीत रमजान ईद उत्साहात
जेजुरी,दि.२२ कुलदैवत खंडेरायाच्या जेजुरी नगरीत पुणे -पंढरपूर महामार्गावरील इदगाह मैदानावर शनिवारी(दि.२२)सकाळी ८:३० वाजण्याचे सुमारास शहरातील मुस्लिम बांधवांनी रमजान ईद सणाची नमाज अदा करीत विश्वशांतीसाठी प्रार्थना केली. रमजान ईद ,अक्षयतृतीया ,महात्मा बसवेश्वर जयंती असा आजचा दिवस असल्याने शहरामध्ये उत्साहाचे आनंदाचे वातावरण होते. जेजुरी नगरी ही सामाजिक सलोख्याची नगरी मानली जाते.येथील मुस्लिम बांधव खंडेरायाच्या धार्मिक विधींमधील मानकरी आहे.रमजान ईद ,अक्षयतृतीया आणि महात्मा बसवेश्वर जयंती एकत्रित आल्याने हिंदू -मुस्लिम एकमेकांना शुभेच्छा देत होते .
सकाळचे सुमारास माजी नगरसेवक मेहबूब पानसरे , नसरुद्दीन सैय्यद,इरफान पानसरे ,दस्तगीर शेख,रफिक पानसरे ,गफूर पानसरे,सादिक बागवान,अशपाक पानसरे,समीर मुलानी, मौलाना दिलदार अहमद ,शब्बीर मणियार ,रज्जाक तांबोळी ,अमीर बागवान,आदींसह शेकडो मुस्लिम बांधवांनी ईदगाह मैदानावर नमाज अदा करीत खैरात वाटण्यात आली.त्यानंतर घरोघरी शिरकुर्मा , गुलगुले सुका मेवा यांच्या मेजवानी देण्यात आली.