जेजुरीत महामार्गावरील चेंबरची दुरावस्था, पालिकेचे दुर्लक्ष
जेजुरी,दि.२१ जेजुरी -सासवड महामार्गावर कडेपठार कमानीनजीक नगरपालिकेचा पाणीपुरवठ्याच्या चेंबरचे वरील झाकण फुटले असून एक फुटांचा मोठा खड्डा पडला आहे.तसेच नगरपालिकेचे अक्षम्य दुर्लक्ष झाले आहे.त्यातूनही पाणीपुरवठ्याच्या वेळी यातून सतत पाणी वाहत असते.त्याहूनही गंभीर बाब म्हणजे कडेपठार कमान असलेल्या मुख्य चौकात सतत वाहतूकीची वर्दळ असते.दुचाकी चारचाकी वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज न आल्याने बऱ्याच जणांना दुखापत झाली आहे.तसेच खड्ड्यात गाडी आदळली गेल्याने वाहणाचेही नुकसान झाले आहे.गेली क्रित्येक महिने येथील नागरिक चेंबर दुरुस्तीची मागणी करत आहेत मात्र प्रशासन व्यवस्था दुर्लक्ष करीत आहे.याबाबत पाणीपुरवठा विभाग प्रमुख राजेंद्र दोडके यांच्याशी संपर्क साधला असता “चेंबर दुरुस्तीच्या कामाची वर्कऑर्डर दिली असून दोन दिवसात समस्येचे निवारण होईल असे सांगण्यात आले.मात्र , नागरिकांच्या जीवाशी खेळणारे हे चेंबर त्वरित दुरुस्त व्हावे अशी मागणी येथील स्थानिक नागरिकांची आहे.