जेजुरीत भीमरत्न पुरस्कार गौरव सोहळा…
भारत देश शक्तिशाली देश म्हणून उदयाला येईल हे डॉ बाबासाहेब आंबडेकर यांचे स्वप्न होते.– डॉ नारायण टाक
जेजुरी, दि २७ ( प्रतिनिधी ) देशाचे संविधान तयार करीत असताना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनांचा अतिशय सखोल अभ्यास केला. संविधान हे सार्वभौम बनवून भारतीय नागरिकांना सत्ताधीश बनविले. लोकशाही ,समता,समाजवाद,धर्मनिरपेक्षता या मूल्यावर आधारित असणारे संविधानामुळे देश शक्तिशाली म्हणून उदयाला येईल असे डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे स्वप्न होते असे विचार अर्थशास्त्रविषयाचे व्याखाते डॉ नारायण टाक यांनी व्यक्त केले.
७३ व्या संविधान दिनानिमित्त पुणे जिल्हा आरपीआय,पुरंदर तालुका आरपीआय,भीमरत्न विचारमंच जेजुरी यांच्या वतीने सलग दहाव्या वर्षी जेजुरी येथे भीमरत्न पुरस्कार गौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रमुख व्याख्याते म्हणून डॉ नारायण टाक बोलत होते. ते पुढे म्हणाले भारतीय राज्यघटना महान आहे म्हणूनच जगातील तज्ञांचा भारतीय संविधान हा अभ्यासाचा विषय ठरला आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सामाजिक कार्यकर्त्या स्नेहलता भालेराव होत्या.यावेळी व्याख्याते डॉ नारायण टाक, राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त प्राचार्य नंदकुमार सागर, पुणे ससून रुग्णालयाचे औषध विभागाचे प्रमुख डॉ रोहिदास बोरसे,डॉ भारती दासवानी,जेजुरी देवसंस्थानचे माजी प्रमुख विश्वस्त डॉ प्रसाद खंडागळे, विश्वस्त संदीप जगताप,माजी सरपंच बापूसाहेब भोर,सामाजिक कार्यकर्ते सचिन खोमणे आदी उपस्थित होते. यावेळी प्राचार्य नंदकुमार सागर, विश्वस्त संदीप जगताप, सागर चव्हाण यांची भाषणे झाली.
यावेळी पुणे ससून रुग्णालयाचे व जेजुरी ग्रामीण रुग्नालायचे वैद्यकीय अधिकारी, साहित्यिक,आरोग्य, नगरपालिका,व पोलीस प्रशासन ,समाजसेवा, शैक्षणिक आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींचा भीमरत्न पुरस्कार देवून गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पुणे जिल्हा आरपीआयचे अध्यक्ष पंढरीनाथ जाधव तर सूत्र संचलन श्री मार्तंड देवसंस्थानचे माजी विश्वस्त नितीन राउत यांनी केले. कार्यक्रमाचे नियोजन पदाधिकारी गौतम भालेराव, चक्रधर सोनवणे,पंचशीला खैरे,नागनाथ झगडे,दादा भालेराव,बबन भोसले सारंग सोनवणे आदीनी केले.