जेजुरीत पुस्तकांची दहीहंडी…वंदेमातरम संघटनेच्या समाजउपयोगी स्तुत्य उपक्रम – राजवर्धिनीताई जगताप

जेजुरी, दि.१४ ग्रंथ चळवळ रुजावी तसेच विद्यार्थ्या मध्ये वाचन संस्कृती निर्माण व्हावी या हेतूेने राष्ट्रीय एकात्मतेची पुस्तक दहीहंडी ही संकलपणा पुणे जिल्हा वंदेमातरम संघटनेने राबविली , हा उपक्रम कौतुकास्पद आहे असे गौवोद्गार ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनीताई संजय जगताप यांनी काढले.
पुणे जिल्हा वंदेमातरम संघटनेच्या वतीने सण करू साजरे माध्यम जरासे वेगळे या संकलपनेच्या अंतर्गत राष्ट्रीय एकात्मतेची पुस्तक दहीहंडी हा उपक्रम येथील ए सी महाविद्यालयात राबविण्यात आला. या राष्ट्रीय एकात्मता दहीहंडी सोहळ्यात डी जे, डॉल्बी ला फाटा देवून पारंपरिक ढोल ताशा वाद्य वाजविण्यात आले. सासवड येथील शिवरूद्र वाद्य संघाच्या वतीने यावेळी दीडशे जनाच्या पथकांनी आसमंत दणाणून सोडले. दहीहंडी सोहळ्या नंतर सुमारे दीड हजार विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले.यावेळी चांद्रयान ची प्रतिकृती तसेच पुस्तकांचे प्रदर्शन भरविण्यात आले होते.

 या दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन ग्रामीण संस्थेच्या अध्यक्षा राजवर्धीनी जगताप यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी पुणे जिल्हा बँकेचे अध्यक्ष प्रा दिगंबर दुर्गाडे,राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते विजय कोलते, भाजपाचे नेते बाबाराजे जाधवराव, संघटनेचे राज्याचे अध्यक्ष वैभव वाघ, कार्याध्यक्ष सचिन जामगे ,नगरसेवक जयदीप बारभाई, सचिन सोनवणे,अजिंक्य देशमुख मनसेचे उमेश जगताप, शिवसेनेचे विठ्ठल सोनवणे,विश्वस्त मंगेश घोणे,डॉ राजेंद्र खेडेकर आदी मान्यवर उपस्थित होते. 

पुणे जिल्हा वंदेमातरम संघटनेचे अध्यक्ष जहीर मुलाणी, विक्रम माळवदकर , अड गणेश लेंडे, अड स्वाती बारभाई, नितीन पुरोहित,अनिकेत हरपळे,सीमा भुजबळ,श्रीकांत पवार,नितीन पुरोहित,सचिन खोमने यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page