जेजुरीत तिरंगामय वातवरणात स्वातंत्र्यदिन साजरा….
जेजुरी दि. १७ महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीत भारताचा ७७ स्वातंत्र्यदिन अतिशय जल्लोषात व तिरंगामय वातवरणात साजरा करण्यात आला.
स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व विद्यालयांच्या वतीने तिरंगा झेंडा फडकावीत शहरातून प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्याच्यात मोठा उत्साह पाहण्यास मिळाला. सकाळी जुन्या पालखी मैदानावर ध्वजारोहणासाठी हजारो नागरिक उपस्थित होते. जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने यावेळी सलामी देण्यात आली तर स्काउट गाईड व विविध विद्यालयातील आर एस पी पथकाच्या वतीने मानवंदना देण्यात आली. त्यानंतर जेजुरी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी चारुदत्त इंगुले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी माजी नगराध्यक्षा विना सोनवणे,आजी माजी नगरसेवक,देवसंस्थानचे विश्वस्त, विद्यालयांचे प्राचार्य,शिक्षक,विद्यार्थी विविध संस्थांचे पदाधिकारी व मोठ्या संख्यने जेजुरीकर नागरिक उपस्थित होते. सर्वच विद्यायायाने हर घर तिरंगा या अभियाना अंतर्गत फेरी मध्ये भारताच्या झेंडे फडकाविले तर घराघरावर तिरंगा झेंडे डौलाने फडकते होते.