जेजुरीच्या मर्दानी दसरा खंडा स्पर्धेत अमोल खोमणे, सचिन कुदळे प्रथम..
तीर्थक्षेत्र जेजुरीच्या मर्दानी दसरा उत्सव काल मोठया उत्साहात साजरा झाला. जेजुरी गड आणि कडेपठार मंदिरातील उत्सवमूर्तींचा पालखी सोहळा रात्रभर जयाद्रीच्या पर्वत रांगांमध्ये रमत असतो,. उंच टेकड्या आणि खोल दरीत रंगणाऱ्या या सोहळ्याला मर्दानी दसरा म्हणून संबोधले जाते. दसऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सांगता समारंभाच्यावेळी मर्दानी खेळाची चित्तथरारक प्रात्यक्षिके पाहून जेजुरीचा मर्दानी दसरा खरेच मर्दानी असल्याची अनुभूती येते.
ऐतिहासिक अशा मर्दानी खंडा स्पर्धेला सकाळी ९ वाजता जेजुरी गडकोटात सुरुवात झाली.
एका हातात खंडा (तलवार ) तोलून धरणे या स्पर्धेमध्ये ३५ युवकांनी सहभाग घेतला यामध्ये प्रथम क्रमांक अमोल खोमणे, द्वितीय -मंगेश चव्हाण, तृतीय हेमंत माने, तर उत्तेजनार्थ -बाबा माने ,विजय कामथे
यांनी पारितोषिके पटकावली तर चित्तथरारक खंडा (तलवार) कसरतीमध्ये प्रथम क्रमांक सचिन कुदळे ,द्वितीय क्रमांक शिवाजी राणे ,तृतीय क्रमांक नितीन कुदळे , तर उत्तेजनार्थ -अक्षय गोडसे ,विशाल माने,सौरभ सकट आदींनी पारितोषिके पटकावली ,स्पर्धेत परीक्षक – पंच म्हणून प्रा.सोमनाथ उबाळे ,पै. कृष्णा कुदळे,माजी विश्वस्त-सुधीर गोडसे यांनी काम पाहिले , प्रमुख विश्वस्त तुषार सहाणे ,विश्वस्त शिवराज झगडे पंकज निकुडेपाटील,डॉ. राजकुमार लोढा ,प्रसाद शिंदे,संदीप जगताप,मुख्याधिकारी राजेंद्र जगताप ,व्यवस्थपक सतीश घाडगे यांचे हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले ,यावेळी ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे , माजी अध्यक्ष गणेश आगलावे , माऊली खोमणे , उद्योजक विजय झगडे ,जेजुरी पोलीस ठाण्याचे उमेश तावसकर,सोनवलकर आदींसह विविध मानकरी ग्रामस्थ ,सेवेकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.या सोहळ्यामध्ये मानकरी ग्रामस्थ ,खांदेकरी यांचा सन्मान करण्यात आला लोककलावंताना मानधन देण्यात आले ,”रोजमुरा” वाटप होऊन सोहळ्याची सांगता झाली ,धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन देवसंस्थान कर्मचारी -अधिकारी व पुजारी ,सेवेकरी,यांनी केले होते.