जेजुरीच्या प्रसिद्ध झेंडू बाजारात शेतकरी नाराज….झेंडू अवघा २० ते ३० रु.किलो…
जेजुरी, दि २३ महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा देवाच्या नगरीत दरवर्षी खंडे नवमी व दसऱ्यानिमित्त झेंडूंच्या फुलांचा मोठा बाजार भरतो. या वर्षी पाऊसाने दडी मारल्याने झेंडू फुलांचे उत्पादन कमी असेल आणि बाजारभाव चांगला मिळेल अशी आशा शेतकरी वर्गात होती. मात्र फुलांच्या बाजारात केवळ २० ते ३० रुपये किलोला दर मिळाल्याने शेतकरी वर्गात नाराजीचे वातावरण आहे. जेजुरी नगरीत खंडे नवमी व दसऱ्या निमित्त झेंडूंच्या फुलांचा रविवार पासून बाजार भरला आहे. रविवारी बाजारात अत्यंत कमी प्रमाणत झेंडूची फुले विक्रीसाठी आली होती. चांगला भाव मिळेल या हेतून शेतकऱ्यांनी सोमवार दि २३ रोजी विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात झेंडूची फुले बाजारात आणली.मात्र मागणी नसल्याने झेंडूच्या फुलांना अपेक्षित दर मिळू शकला नाही. पुरंदर तालुक्यातील शेतकरी दसरा आणि दिवाळीचा सण साजरा करण्यासाठी झेंडूच्या फुलांची शेती करीत असतात. यावर्षी पाऊसाने दडी मारल्याने खरीपाची पिके वाया गेली. झेंडूची शेती ही त्यामुळे करता आली नाही . जेजुरी परिसरातील शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर झेंडूच्या फुलांची शेती केली. मात्र फुलांना चांगला दर मिळू शकला नाही. गेल्या वर्षी शंभर ते दोनशे रुपये दर मिळाल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण होते. घाऊक बाजारात २० ते ३० रुपये तर किरकोळ बाजारात ५० ते ७० रुपये असा दर विक्रीसाठी होता.उत्पादन कमी असून ही बाजार कमी आणि व्यापाऱ्यांनी मात्र चांगली संधी मिळवल्याची चर्चा बाजारात होती.
झेंडू फुलांबरोबर आपट्याची पाने हि मोठ्या प्रमाणत विक्रीसाठी आली होती.
सोबत फोटो पाठवला आहे.
जेजुरी दसरा उत्सवानिमित्त झेंडूंच्या फुलांचा बाजार भरला होता.