जेजुरीच्या खंडेरायाला पानसरे कुटुंबियांकडून पंचकल्यानी अश्व अर्पण…मिरवणुकीने अश्वाचे स्वागत
जेजुरी,दि.२४ अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत म्हणून प्रचलित असलेल्या जेजुरीच्या खंडेरायाला…. पिंपरी चिंचवडचे माजी उपमहापौर खंडेरायाच्या धार्मिक विधींमधील मानकरी असलेल्या महंमदभाई पानसरे परिवाराने मानाचा पंचकल्याणी अश्व अर्पण केला आहे. पिंपरी चिंचवड येथून जेजुरीकडे येताना दगडूशेठ गणपती मंदिराजवळ विधिवत गणेश पूजन व अश्व पूजन करून भंडारा उधळण करण्यात आली तर बुधवारी(दि.२२) सकाळी १२वाजता गुढीपाडवा- नववर्षाचे औचित्य साधून सनई चौघड्याच्या मंगलमय सुरात ,व ताशांच्या गजरात.. भंडारा उधळणीत जेजुरी शहरातून खंडेरायाला अर्पण केलेल्या पंचकल्याणी अश्वाची ग्रामस्थांच्या साथीने मिरवणूक काढण्यात आली.. यावेळी माजी उपमहापौर महंमदभाई पानसरे,पिंपरी चिंचवडच्या माजी नगरसेविका अमिना पानसरे,जाफर पानसरे ,इरफान पानसरे,अशपाक पानसरे,उद्योजक मेहबूब पानसरे ,जेजुरीच्या माजी नगरसेविका अमिना पानसरे ,नसरुद्दीन सैय्यद , अश्व सांभाळणारे मानकरी बंटी खान ,व पानसरे परिवाराने विधिवत पूजा आरती करून अश्व ग्रामस्थ ,खांदेकरी मानकरी यांच्या स्वाधीन केला. मिरवणुकीने व भंडारा उधळणीत अश्व गडावर आल्यानंतर देवसंस्थानच्या वतीने मुख्याधिकारी राजेंद्र जगताप ,व्यवस्थापक सतीश घाडगे यांनी पानसरे परिवाराचा सन्मान करीत आभार व्यक्त केले.यावेळी खांदेकरी मानकरी ,ग्रामस्थ मंडळाचे अध्यक्ष जालिंदर खोमणे ,पै.कृष्णा कुदळे ,माऊली खोमणे ,पुजारी ,सेवेकरी ,मानकरी ,ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पानसरे परिवार खंडेरायाचा निस्सीम भक्त असून गेली क्रित्येक वर्षे लाखो रुपये किमतीचा “पंचकल्याणी अश्व ” ते अर्पण करीत आहेत..या पंचकल्याणी अश्वाला पालखी सोहळ्यात मोठा मान आहे. पालखी सोहळ्यापुढे असणाऱ्या श्रींच्या अश्वाचे प्रथम दर्शन घ्यावे लागते. तर अश्व सांभाळण्याचा मान खान बंधूंकडे आहे