जेजुरीच्या ऐतिहासिक खंडा स्पर्धेत ६४ जणांचा सहभाग….अंकुश गोडसे, आणि नितीन कुदळे प्रथम …
जेजुरी, दि. २५ जेजुरीच्या मर्दानी दसऱ्याचा सलग १८ तासांचा सोहळा संपन्न झाल्यानंतर जेजुरी गडावर सुरू झाल्या खंडा ( तलवार) कसरत स्पर्धा.
दसरा उत्सवातील युवा वर्गाचा अत्यंत प्रिय सोहळा म्हणजे खंडा स्पर्धा. सुमारे ४३ किलोचा खंडा जास्तीत जास्त वेळ पेलून धरणे, त्याच्या कसरती करणे या स्पर्धेत सुमारे ६४ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. यातील जास्तीत जास्त वेळ खंडा तोलून धरण्याच्या स्पर्धेत अंकुश गोडसे,(प्रथम क्रमांक) अमोल खोमणे,( द्वितीय क्रमांक) हेमंत माने,( तृतीय क्रमांक ) सुहास खोमणे,( चतुर्थ क्रमांक) मंगेश चव्हाण,(पाचवा क्रमांक) उत्तेजनार्थ गिरीश घाडगे, संदीप दोडके यांनी पटकावले तर खंडा कसरत स्पर्धेत – नितीन कुदळे, विशाल माने, प्रवीण गोडसे, शिवा राणे, सचिन कुदळे, यांनी अनुक्रमे प्रथम पाच क्रमांक पटकावले तर उत्तेजनार्थ चेतन कुदळे, बापू राऊत या दोघांना संधी मिळाली. दोन्ही स्पर्धेतील विजेत्यांना अनुक्रमे ३००००, २१०००, १५०००, ११०००, तर उत्तेजनार्थ ७००० व ५००० अशी रोख रक्कम व स्मृतीचिन्ह देण्यात आले यावेळी मार्तंड देव संस्थान चे प्रमुख विश्वस्त पोपट खोमणे, अड्. पांडुरंग थोरवे,अड्. विश्वास पानसे, डॉ.राजेंद्र खेडेकर, अनिल सौन्दडे, मंगेश घोणे, माजी विश्वस्त सुधीर गोडसे, संदीप घोणे, नितीन राऊत जेजुरी पोलीस ठाण्याचे पो. नि. बापूसाहेब सांडभोर, देव संस्थानचे कर्मचारी ,मानकरी पेशवे, खोमणे, माळवदकर , ग्रामस्थ मंडळा चे अध्यक्ष जालिंदर खोमणे, पुजारी, सेवेकरी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते