जेजुरीकर भारत जोडो यात्रेत, राहुल गांधीना श्री खंडोबा देवाची प्रतिमा भेट
जेजुरी, दि १७ खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेत जेजुरीतील काँग्रेस कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन खासदार राहुल गांधी यांना महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबा देवाची। प्रतिमा भेट देऊन भारत जोडो यात्रे साठी शुभेच्छा दिल्या .
बाबराज्याचे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले,पुरंदरचे आमदार संजय जगताप,जेजुरी पालिकेचे माजी नगरसेवक हेमंत सोनवणे, काँग्रेसचे कार्यकर्ते बाळासाहेब जगताप,सुशील राऊत, ईश्वर दरेकर,संतोष तोडकर आदी कार्यकर्ते महाराष्ट्रातील शेगाव येथे या यात्रेत सहभागी झाले होते . प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी यावेळी राहुल गांधी यांची भेट घेऊन त्यांना श्री खंडोबा देवाची प्रतिमा भेट देऊन शुभेच्छा दिल्या
.जेजुरीचा खंडोबा हे महाराष्ट्रातील बहुजन समाजाचे श्रद्धास्थान असून दरवर्षी ५० लाखाहून अधिक भाविक येथे येत असतात . आपणही जेजुरीला यावे अशी विनंती करण्यात आली . आपल्याला संधी मिळाली तर आपण नक्की येऊ असे यावेळी राहुल गांधी यांनी सांगितले .