जेजुरीकरांचे स्वप्न होणार साकार.. जेजुरीत मल्हार नाट्यगृहाचे भूमिपूजन…
जेजुरीच्या वैभवात पडणार भर
जेजुरी, दि.१८ ( प्रतिनिधी ) जेजुरीत भव्य व आधुनिक नाट्यगृह उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली होती.हि संकल्पना प्रत्यक्षात साकार होत आहे. परिपूर्ण जेजुरी नगरी उभी रहाण्यासाठी पाउल टाकले आहे, नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक आणि जेजुरीकर नागरिकांच्या सहकार्यामुळे जेजुरी शहराचा कायापालट होत आहे असे पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांनी आपल्या भाषणात सांगितले.
जेजुरी नगरीच्या वैभवात भर घालणारे सुमारे चार कोटी पंचवीस लाख रुपये खर्चून अद्यावत सर्व सुविधायुक्त नाट्यगृह उभारले जात आहे. या नाट्यगृहाचे भूमिपूजन पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी नगराध्यक्ष वीणा सोनवणे, गट नेते सचिन सोनवणे,नगरसेविका रुक्मिणी जगताप,नगरसवेक अजिंक्य देशमुख,महेश दरेकर,गणेश शिंदे,माजी नगरसेवक हेमंत सोनवणे , सदाशिव बारसुडे, रवींद्र जोशी,रमेश बयास,अनिल वीरकर, सुशील राउत,प्रवीण जगाताप,कॉंग्रेसचे युवक शहर प्रमुख ईश्वर दरेकर आदी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार संजय जगताप पुढे म्हणाले पाच वर्षापूर्वी जेजुरीकर नागरिकांच्या सहकार्यामुळे जेजुरी पालिकेत कॉंग्रेसची सत्ता आली. आम्ही दिलेल्या सर्व आश्वासनाची परिपूर्तता करण्यात आली. सर्व सामान्य नागरिकां लग्न,साखरपुडा,छोटे कार्यक्रमासाठी हे नाट्यगृह व परिसरातील जागा उपलब्ध करून देण्यात येईल कोणावरही अन्याय होणार नाही. जेजुरी शहराचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडविणे,धालेवाडी रस्ता व नवीन विकास कामे यापुढे जेजुरी शहरात राबविली जाणार आहे.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक हेमंत सोनवणे यांनी आमदार संजय जगताप यांच्या संकल्पनेतून सव्वा चार कोटी रुपये खर्चून नाट्यगृह उभे रहात आहे. पूर्वीचे सांस्कृतिक भवन मोडकळीस आले होते. याजागी सर्वसुविधायुक्त नाट्यगृह उभे रहात आहे सांस्कृतिक कार्यक्रमासाठी हक्काचे व्यासपीठ निर्माण होणार आहे.शहरातील गोर गरीब जनतेला विविध कार्यक्रमासाठी मोफत सुविधा उपलब्ध करण्यात येणार आहे.असे सांगितले
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संभाजी जगताप यांनी केले तर उपस्थितांचे आभार नगराध्यक्षा वीणा सोनवणे यांनी मानले