जीवन जाधव यांच्याकडून हडपसर परिसरात फिरत्या विसर्जन हौदाची सोय, सुमारे दोन हजारांवर मूर्तींचे संकलन..

हडपसर, दि.९ भारतीय जनता पक्षाचे पुणे शहर भाजप नेते जीवन बापू जाधव यांनी आजच्या गणेश विसर्जनासाठी हडपसर परिसरात ठिकठिकाणी गणेश विसर्जन हौद तसेच फिरते विसर्जन हौद निर्माण करून गणेश भक्तांना मोठा दिलासा दिला होता. दुपारपर्यंत या उपक्रमात सुमारे दोन हजार गणेश मूर्तींचे संकलन झाले.
पुणे भाजपा चे नेते जीवन बाप्पु जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली हडपसर परिसरात ड्रीम्स आकृती, काळे पडळ, इसिपी वास्तू, तरडे वस्ती, गंगा व्हिलेज, कृष्णा नगर, चिंतामणी नगर, हांडेवाडी रोड, वाडकर मळा, ससाणे नगर, संकेत पार्क, अल्कासा सोसायटी, महमदवाडी, सिद्धिविनायक कॉलनी, आदी परिसरात या गणेश मूर्तींच्या विसर्जनासाठी विसर्जन हौद तसेच ठिकठिकाणी फिरते विसर्जन हौदाची सोय उपलब्ध करून दिली होती. श्री जाधव यांचे कार्यकर्ते प्रत्येकाशी संपर्क साधून गणेश विसर्जनासाठी आवाहन व मार्गदर्शन करीत होते.
गेल्या ९ वर्षांपासून श्री जाधव यांचा हा उपक्रम सुरू असून नागरिकांतून त्यांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक होत आहे.
जीवनबाप्पू जाधव यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांना गणेश विसर्जन करण्याची मोठी सोय झाली होती. नागरिकांचा ही या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. परिसरातून त्यांच्या या उपक्रमाचे कौतुक होत असल्याचे गणेश भक्त किरणशेठ काळे देशमुख तसेच बाळासाहेब तापकीर यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page