जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. – आमदार राम शिंदे वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने गुणवंत शिक्षक पुरस्कार सोहळा

जेजुरी, दि. ४ योग्य वेळी, योग्य ठिकाणी मार्गदर्शन मिळाले नाही तर त्या व्यक्तीचे आयुष्य भरकटते. ज्ञानदानाचे पवित्र कार्य गुरुजन सातत्याने करतात. त्यामुळे समाजाचा सर्वांगीण विकास होतो. शिक्षक सुसंस्कारित पिढी घडवण्याचे कार्य करतात .जीवनात यशस्वी होण्यासाठी गुरुची आवश्यकता असते. असे प्रतिप्रादन आमदार ॲड. राम शिंदे यांनी केले.

   पुरंदर तालुक्यातील हिवरे येथे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालींदर कामठे यांच्या वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शैक्षणिक क्षेत्रात वैविध्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना गुणवंत शिक्षक पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी ॲड. शिंदे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रदीप कंद होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष गणपत फुलावडे, पुणे जिल्हा भाजपा अध्यक्ष गणेश भेगडे,पुणे विभाग सहायक शिक्षण संचालक मीना शेंडकर ,खरेदी विक्री संघाचे व्हाईस चेअरमन एम. के. गायकवाड, समाजसेवक शब्बीरभाई शेख, राष्ट्रपती पारितोषिक विजेते मुख्याध्यापक कुंडलिक मेमाणे , प्राचार्य नंदकुमार सागर, शिक्षकनेते सुधाकर जगदाळे ,हिवरे गावच्या सरपंच पूनम कुदळे, उपसरपंच रामदास कुदळे , ग्रामपंचायत सदस्य मनोज कुटे,विकास गायकवाड, माजी उपसरपंच रमेश कुदळे, धर्माजी गायकवाड, सचिन लिंभोरे, शांताराम दळवी ,विठ्ठल मेमाणे, धीरज जगताप, बापूसाहेब मेमाणे आदींसह विविध शिक्षक संघटनांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, शिक्षक उपस्थित होते .

    शिक्षण संचालक मीना शेंडकर म्हणाल्या यांनी गेली 21 वर्ष वसंतदादा पाटील प्रतिष्ठानच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात येतात .त्याचबरोबर विविध सामाजिक कामेही सातत्याने होत आहेत . त्याबद्दल वसंतदादा पाटील प्रतिष्ठानचे अध्यक्ष जालिंदर कामठे यांचे यांचे अभिनंदन केले. 

शिक्षक गुणवंत पुरस्कारार्थी शाळानिहाय पुढील प्रमाणे – पी. एस. मेमाणे ( शिक्षणविस्तारधिकारी पं.स.पुरंदर) ,प्रतिभा बोत्रे (केंद्रप्रमुख गराडे ),ईस्माईल सय्यद, (प्राचार्य पुरंदर कॉलेज, सासवड), रविंद्र निगडे (बेलसर ),दत्तात्रय धिंदळे( पिसर्वे), नितीन कोलते (शिवरी), मोहन नातू (रिसे), हेमंत जगताप (जेजुरी ),सुग्रीव चव्हाण( कोथळे ), ज्ञानेश्वर वाघमारे( वाघापूर) संगिता रामदासी (सासवड ),कांतीलाल कोलते ( जवळार्जुन), स्मिता बोराटे (हिवरे), संदिप खेडकर ( भिवरी), सुरेश गोरे (नायगाव), उज्वला कांबळे (घोरपडेवाडी ) ,शितल लोणकर( पिलाणवाडी), दत्तात्रय गायकवाड (धालेवाडी), सुवर्णा जगताप (गुरोळी) , ईश्वर पाटील (हनुमानवाडी), विजय कापरे (कुदळेवाडी), प्रकाश मारणे( सासवड ),राहुल आबनावे (कोळविहीरे), अशोक भगत (काळदरी), भाऊसाहेब उघडे (खानवडी ) .
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जालींदर कामठे यांनी केले‌. सूत्रसंचालन विकास भोसले यांनी केले. आभार प्राचार्य सुनिता रायुडू यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page