जनावरांच्या लंपी आजारावर बेलसरने राबविला मोफत लसीकरणाचा उपक्रम.
जेजुरी, दि. ९ लंपी चर्म आजाराने महाराष्ट्रात धुमाकूळ घातला असताना अनेक जनावरे मृत्युमुखी पडत आहेत ,आज शेतीपूरक व्यवसाय म्हणून दुग्ध व्यवसायाकडे पाहिले जाते, शेतकऱ्यांना आर्थिक आधार देणारा हा एक चांगला उद्योग निर्माण झाला आहे ,सध्या दुधाला चांगले दर मिळत असल्यामुळे शेतकऱ्याला थोडे सुखाचे दिवस आले असतानाच ,अचानकपणे लंपी या आजाराने जनावरांना विळखा घातला आहे ,पुरंदर तालुक्यामध्ये सासवड शिवरी या परिसरामध्ये लंम्पी चर्म आजाराचे अनेक जनावरे आढळून येत असतानाच, बेलसर ग्रामपंचायत ने यासंदर्भात तालुका पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडे पूर्ण मनुष्यबळ उपलब्ध नाही तेवढ्या मोठ्या प्रमाणात लस्सी उपलब्ध नाहीत, हे समजल्यानंतर ग्रामपंचायत बेलसर ने स्थानिक डेअरी चालकांबरोबर चर्चा करून व स्थानिक पशुवैद्यकीय अधिकारी व गावामध्ये जनावरांचे डॉक्टर यांच्याबरोबर चर्चा करून गावातील जवळजवळ अडीच हजार जनावरांना मोफत लसीकरण करण्याचा निर्णय घेतला, आणि आजपासून लसीकरणही चालू करण्यात आले, लसीचा मोठ्या प्रमाणात तुटवडा असताना देखील जवळपास दीड हजार लस आज उपलब्ध करण्यात आली, पहिल्या दिवशी 300 जणांना यशस्वी लस देऊन उर्वरित दोन दिवसांमध्ये पूर्ण लसीकरण करण्याचा मानस असल्याचे उपसरपंच धीरज जगताप यांनी सांगितले, यावेळी लसीकरणासाठी भोईटे डेअरी, हिंगणे डेअरी ,जगताप डेअरी ,होले डेअरी व स्थानिक डॉक्टर सोमनाथ व डॉक्टर अमोल यांनीही शेतकऱ्यांना पूर्ण सहकार्य केले, यावेळी बेलसरचे सरपंच अर्जुन धेडे ,उपसरपंच धीरज जगताप, ग्राप सदस्य चंद्रकांत हींगणे, संभाजी बापू गरुड उमेश हिंगने,पोपट, जगताप अनिल गरुड मा सरपंच हनुमान जगताप तंटामुक्त अध्यक्ष प्रकाश बूधे, तुषार कुदळे हे उपस्थित होते