छेडछाड करणाऱ्यांची गय नाही विद्यार्थिनीनी पोलिसांना माहिती द्यावी – पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर
जेजुरी,. दि.२८ जेजुरीच्या महाविद्यालयात शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या मुलींची छेडछाड होत असेल तर मुलीनी अन्याय सहन करून नका.शिक्षक अथवा पोलिसांना यासंदर्भात माहिती द्या. शालेय विद्यार्थ्यानी दुचाकी वाहनाचा वापर करू नका अन्यथा पालकांवर कारवाई करण्यात येईल असे आवाहन जेजुरी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी जेजुरी येथील ए सी हुंडेकरी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना केले.
जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने सलग पाच दिवस विना परवाना तसेच ट्रिपल सीट वाहने चालविणे, अवैद्य वाहतूक करणे, वाहनांचा दंड न भरणे, कॉलेज परिसरात गाड्यांचे पुंगळ्या काढून कर्कश आवाजात दुचाकी चालविणे आदी प्रकाराना आळा बसण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. या पाच दिवसात जेजुरी पोलिसांनी दोन लाख रुपयांहून अधिक रुपये दंडाची वसुली वाहन चालकांकडून करण्यात आली शुक्रवार दि २८ रोजी पुणे पंढरपूर महामार्गावरील अहिल्यादेवी विद्यालयासमोर नाकाबंदी करून विना परवाना दुचाकीचालविणाऱ्या तसेच अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या पालकांवर कारवाई करण्यात आली.
या संदर्भात विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी या हेतूने जेजुरी पोलीस स्टेशनच्या वतीने येथील ए,सी, हुंडेकरी महाविद्यालयात पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. मुलींच्या सुरक्षिततेसाठी महिला पोलिसांचे दामिनी पथक हि प्रत्येक विद्यालयात मार्गदर्शन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे मुली बाबत कोणतेही गैरवर्तन होत असेल तर ते लपवून ठेवून नका,आपल्या पालकांना ,शिक्षकांना याविषयी माहिती द्या, कोणीही अन्याय सहन करू नका. पोलीस आपल्या पाठीशी आहेत. विद्यार्थ्यांनी विद्यालयात दुचाकी वाहनाचा वापर करू नका, बाहेरील मित्रांबरोबर दुचाकी वाहनावर विद्यालयात येवून गैरवर्तन करून नका अन्यथा कारवाईला सामोरे जावे लागेल असे सांगितले.
विद्यालयाचे प्राचार्य पोपटराव ताकवले,पर्यवेक्षक अनिल रासकर,तसेच अध्यापक वर्ग पालक व्यवस्थापन संघाचे अध्यक्ष सदस्य यावेळी उपस्थित होते.