चांद्रयान यशस्वी व्हावे म्हणून जेजुरी गडावर अभिषेक….
जेजुरी, दि. २३ भारताचे चांद्र यान आज सायंकाळी चंद्रावर उतरत आहे. या घटनेकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. तर संपूर्ण देशभर पूजा अभिषेक, प्रार्थना सुरू आहेत. भारतीय शास्त्रज्ञाना यश मिळावे आणि चांद्र यान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून कुलदैवत जेजुरीच्या खंडेरायला साकडे घालण्यात आले आहे
मार्तंड देव संस्थान आणि पुजारी सेवक वर्गाकडून मल्हारी मल्हारी मार्तंडाला देव संस्थानचे विश्वस्त अनिल सौंदडे यांच्या हस्ते विधीवत पूजा करून अभिषेक घालण्यात आला, यावेळी देवस्थानचे कर्मचारी भाविक आदी उपस्थित होते