घर एक्सप्रेस वे मार्गावर घर आले,शेतकऱ्याने ते अडीचशे फूट हलवले

जेजुरी, दि.२३ ( प्रतिनिधी) सोशल मीडिया हे एक असं प्लॅटफॉर्म आहे, जे लोकांना त्यांची क्रिएटिविटी आणि टॅलेंट दाखवण्याची संधी देते. तसेच येथे अनेक कॉमेडी, तसेच जुगाडू व्हिडीओ देखील समोर येतात, जे आपलं मनोरंजन करतात. सोशल मीडियावर सध्या अशीच एक घटना समोर आली आहे. ज्यामुळे सर्वच अचंबित झाले आहेत.

स्वत:चं घर असणं हे अनेकांचं स्वप्न असतं, आपल्या मेहनतीने घर उभारलं आहे, त्यामुळे ते घर प्राणापेक्षा प्रिय असतं, हे तर आपल्याला माहितच आहे. तरी देखील बऱ्याचदा अशी परिस्थिती निर्माण होते, ज्यामुळे मनात नसताना देखील आपल्या आपलं घर सोडावं लागतं आणि असंच काहीस एका शेतकऱ्यासोबत झालं.

परंतु या सगळ्यात खचून न जाता या शेतकऱ्याने भलताच जुगाड लावला आणि आपलं घर वाचवलं, ज्यामुळे तो सर्वत्र चर्चेत आला.

शेतकरी सुखविंदर सिंग यांचे घर दिल्ली-जम्मू-कटरा एक्स्प्रेस वेच्या मार्गावर येत होतं. त्यामुळे ते घर सोडणं शेतकऱ्याला गरजेचं होतं. पण त्याला आपलं घर सोडायचं देखील नव्हतं, ज्यामुळे त्याने आपलं घर वाचविण्यासाठी त्याने तंत्रज्ञानाचा अवलंब केला, जेणेकरून घरही वाचू शकेल आणि शासकीय योजनेत कोणताही अडथळा येणार नाही

भारत माला प्रकल्पांतर्गत शेतकऱ्यांच्या जमिनी संपादित करण्यात आल्या आहेत. शेतकरी सुखविंदर सिंग यांची जमीनही त्यात आहे. सुखविंदर सिंग यांनी सांगितले की, त्यांचे सव्वा कोटी रुपये किमतीचे घर २०१९ मध्ये तयार झाले होते. तसेच या घरात त्यांच्या आठवणी आहेत, एवढेच नाही तर हे घर बांधायला त्यांना खूप खर्च आला होता, ज्यामुळे त्यांना ते सोडायचं नव्हतं.

लिफ्टिंग तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांनी आपलं घर २५० फुटांपेक्षा जास्त हलवले. हे काम करण्यासाठी त्यांना दोन महिने लागले. वास्तविक, घर अडीचशे फुट आणि शिफ्ट करावे लागेल, त्यानंतर घर ६० फुटांपर्यंत दुसऱ्या बाजूला वळवले जाईल. हे सगळं करण्यासाठी सुखविंदर सिंग यांना ४० लाख रुपये खर्च आला आहे.

हे घर स्थलांतरित करणाऱ्या लोकांसाठी हे मोठ आव्हान होतं. ते दररोज हे घर दहा फुट पुढे ढकलत होते. असं करुन त्यांनी आतापर्यंत जवळ-जवळ २५० फुटांपेक्षा जास्त घर हलवले आहे. तुटण्यापासून वाचवलं. या कामाला बराच वेळ लागला असला तरी, यात कोणाचेही नुकसान न करता या शेतकऱ्याची इच्छा पूर्ण झाली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page