ग्रामीण भागात ही स्वातंत्र्याचा जल्लोष
कदमवस्ती शाळेत स्वतंत्रता दिन साजरा
जेजुरी, ( प्रतिनिधी) देशभरात भारतीय स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात आहे. अमृतमहोत्सवाचा जल्लोष अगदी ग्रामीण भागातील वाडीवस्त्यांवर ही तेवढाच उत्साह दिसून येत होता. पुरंदर तालुक्यातील कदमवस्ती येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत विध्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी मोठया उत्साहात स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला.
विविध वेशभूषा परिधान करीत विध्यार्थी विध्यार्थीनींनी आपली मनोगते व्यक्त केली. तत्पूर्वी कदम वस्ती शाळेचे मार्गदर्शक जेष्ठ पत्रकार बी एम काळे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले होते.
यावेळी मुख्याध्यापक अनंता जाधव, सहाशिक्षिका सुरेखा जाधव, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विशाल चव्हाण, समता प्रतिष्ठानचे अध्यक्ष दिगंबर कदम,पोलीस पाटील प्रियांका चव्हाण, पालक प्रताप गरुड, ,ईश्वर कदम, निलेश कदम, सचिन कदम, श्रीकांत कदम,कैलास हिंगणे,लहू कदम,हनुमंत कदम, महेश कदम आदी उपस्थित होते. कार्यक्रमात विद्यार्थ्यांच्या खाऊसाठी सुमारे १७ हजार रुपये ग्रामस्थांनी वर्गणी करून मुख्याध्यापकांकडे सुपूर्त केले.
सूत्रसंचालन सुरेखा जाधव यांनी केले.