ग्रामदैवता जानाईदेवी पालखी सोहळ्याचे जेजुरीत उत्साहात स्वागत…!
जेजुरी. दि. ७. महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री खंडोबा देवाच्या जेजुरी नगरीची ग्रामदैवता जानाई देवी पालखी सोहळा परतीच्या प्रवासानंतर जेजुरीत पोहचला. यावेळी जेजुरी कर नागरिकांनी सडा रांगोळी घालून,गुलाल,व भंडाराची उधळण,फटक्यांची आतषबाजी करून या सोहळ्याचे मोठ्या उत्साहात स्वागत केले.
ग्रामदैवता जानाईदेवी हे जेजुरीकर नागरिक व हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आहे. या देवतेचे मूळस्थान सातारा जिल्ह्यातील निवकने येथे असून दरवर्षी येथे देवीची यात्रा होते. दिनांक २२ रोजी जानाई देवीचा पालखी सोहळा जेजुरीत निवकणें कडे मार्गस्थ झाला होता दिनांक २८ रोजी निवकने येथे यात्रा संपन्न झाली यावेळी जेजुरीत २० हजारहून अधिक भाविक सहभागी झाले होते.
परतीच्या प्रवासा नंतर देवीचा पालखी सोहळा मंगळवार दिनांक ६ रोजी सायंकाळी जेजुरीत पोहचला. यावेळी पालखी मार्गावर सडा रांगोळी घालून देवीचे आउक्षन करण्यात आले. वादयाच्या गजरात,गुलाल,भंडार,फुलांची उधळण फटाक्यांची आतषबजी करीत या सोहळ्याचे भाविकांनी स्वागत केले.आठ तास चाललेल्या या मिरवणूक सोहळ्यात हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. जानाई भक्त नागू माळी ट्रस्टचे प्रमुख नागनाथ झगडे, जानाईदेवी पालखी सोहळा अन्नदान ट्रस्टचे अध्यक्ष शिवाजी कुतवळ व पदाधिकारी यांनी या सोहळ्याचे नियोजन केले होते.