गैरवर्तन करणाऱ्यांचा सन्मान होतोच कसा ? पुरस्कार देणाऱ्या संस्थांनी ही याचा विचार करायला हवा… सोशल मीडियावर व्हायरल पोस्टमुळे पुरंदरमधील शैक्षणिक क्षेत्रात चर्चेला उधाण ….
जेजुरी, दि. १० ( प्रतिनिधी ) नुकताच ५ सप्टेंबर शिक्षक दिन संपूर्ण देशभरात साजरा करण्यात आला. केंद्र शासन राज्यशासन, जिल्हा प्रशासनाकडून अनेक आदर्श शिक्षक, शिक्षकांना पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. त्यानंतर मात्र अनेक संस्था, संघटना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन शिक्षकांना ससन्मानीत करण्याचे सर्वत्र पेवच फुटले आहे. पुरस्कार नक्कीच द्यायला हवा. आदर्श व्यक्तिमत्त्वांचा गौरव ही व्हायला हवा. मात्र कधी कधी गैरवर्तन करणारे ही आदर्श ठरुन जातात याची मात्र चर्चाच होत असते. यामुळे पुरस्कार देणारी संस्था, संघटना बाबत मात्र प्रश्न चिन्ह निर्माण होते.
असाच एक प्रकार सद्या पुरंदरच्या शैक्षणिक क्षेत्रात सर्वत्र चर्चिला जात आहे. चुकीचे वर्तन करून कोणत्यातरी शाळेवर जाऊन मार्गदर्शन केले.त्यांचाच सन्मान कोणतरी करणार असल्याचे समजते.अ शांचा सन्मान होतोच कसा?
यांच्या तक्रारी संबंधितांकडे करून सन्मान रद्द करण्यात यावा. याबाबत एकत्रित येऊन निर्णय घ्या.असे जाहीर आवाहन शिक्षक ग्रुप वर जाहीर रित्या दिल्याने पुरस्कारार्थी निवडताना गडबड झाल्याची भावना पुरंदरच्या शैक्षणिक क्षेत्रामध्ये आहे.
अनेक सामाजिक संस्था संघटना व प्रतिष्ठान मार्फत शिक्षकांच्या उल्लेखनीय व प्रशंसनीय शैक्षणिक कार्याची दखल घेऊन शिक्षकांना प्रेरणा व प्रोत्साहन मिळावे या हेतूने “उत्कृष्ट गुणवंत शिक्षक”पुरस्काराने अनेक शिक्षकांना सन्मानित केले जाते.
मात्र अशा संस्था प्रतिष्ठान मार्फत पुरस्कारार्थी निवडी मध्ये काही आक्षेपार्ह व आरोप असलेल्यांची “पुरस्कारार्थी” म्हणून निवड होताच अशा आक्षेपार्ह पुरस्कारार्थीं बाबत जाहिर चर्चा होत आहे.
पुरस्कारार्थी म्हणून निवड झाल्यावर पुरस्कारार्थींना आनंद होणे अपेक्षित आहे.ज्यांची पुरस्कारासाठी निवड झाली. अशा पुरस्कारार्थींनी आपल्या कुटुंबासह मित्रपरिवार, नातेवाईकांसह,आपण कार्यरत असलेल्या ठिकाणच्या पालक, ग्रामस्थांसह मोठ्या अभिमानाने पुरस्कार स्वीकारायला उपस्थित राहावे.
असे ज्या प्रतिष्ठानने संस्थेने किंवा संघटनेने पुरस्कार दिले आहेत त्यांना वाटते.
परंतू काही पुरस्कारार्थीं स्वतःला पुरस्कार जाहीर झाल्याच्या नंतर कोणालाच कसलीच कल्पना देत नाहीत.
पुरस्कार स्वीकारण्यासाठी देखील एकटेच येतात. स्वतःचे कुटुंब नातेवाईक मित्रपरिवार तर सोडाच परंतु स्वतःची पत्नी किंवा पतीला देखील पुरस्कार स्वीकारण्यासाठी आपल्या बरोबर घेऊन येत नाहीत.
संबंधित संस्था, संघटना किंवा प्रतिष्ठान अशा पुरस्कारार्थींची निवड का करतात?
याबाबतीतही जाहीर चर्चा सुरू आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या एका प्रतिष्ठानच्या पुरस्कार निवडीमध्ये एका पुरस्कार्थीची आक्षेपार्ह निवड झाल्याची चर्चा आहे.
संबंधित पुरस्कारार्थीने देखील आपणाला पुरस्कार जाहीर झाल्यावर आपल्या मित्रपरिवार नातेवाईक यांना पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याबाबत कसलतीच कल्पना दिली नाही.
या पुरस्कारार्थीलाच पुरस्कार मिळाल्याचे आपल्या नातेवाईकांना व मित्र परिवारांना सांगण्याबाबत संकोच का वाटतो ?अशी देखील चर्चा आहे.
संबंधित पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका पुरस्कार्थींने चुकीचे वर्तन केल्यामुळे अशांचा सन्मान होतोच कसा? अशा पुरस्कारार्थीच्या चुकीच्या वर्तनाबाबत प्रतिष्ठान कडे तक्रारी करून सन्मान रद्द करण्यात यावा.अशी जाहीर चर्चा सुरू आहे.
त्यासाठी एकत्रित येऊन निर्णय घ्या.
असे जाहीर आवाहन देखील झाल्याचे पहावयास मिळत आहे.