गणेश विसर्जन मिरवणुकीत शिंदे गट शिवसेनेत राडा…दादरमध्ये दोन्ही गटाकडून क्रॉस कॅम्पलेंट..

मुंबई, दादर दि. ११

प्रभादेवीत शिंदे गट-शिवसैनिकांमध्ये पुन्हा राडा झाला आहे. काल रात्री शिंदे गटातील शाखा प्रमुखांना शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून चोप देण्यात आल्याचं वृत्त आहे.

त्यानंतर शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. विसर्जनावेळी दोन्ही गट आले आमने-सामने असताना आमदार सदा सरवणकरांनी गोळीबार केल्याचा आरोप करण्यात आला असला तरी गोळीबाराचा आरोप सरवणकरांनी फेटाळला आहे.

या प्रकरणी शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांनी फिर्याद दिली आहे. त्यानंतर दादर येथील ५ शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. दरम्यान, हे वृत्त पसरताच येथे शिवससैनिकांनी प्रचंड गर्दी केल्याने तणावाचं वातावरण पाहायला मिळतंय.

शिंदे गटाचे शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांनी ठाकरे गटावर मारहाणीचा आरोप केला आहे आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना मारहाण केल्याचं म्हटलं आहे . दादर शिवसेनेचे गटातील महेश सावंत यांच्यावर हा आरोप करण्यात येतोय. शिवाय शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकरांवर दादर पोलिस स्टेशनच्या आवारात गोळीबार केल्याचा आमदार सुनिल शिंदे यांनी आरोप केलाय. दरम्यान 5 शिवसैनिकांना अटक करण्यात आलीये. शिंदे गटाचे नेते संतोष तेलावणे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर हा वाद समोर आलाय.

समाधान सरवणकर – गर्दीत डायलॉगबाजी :
शिंदे गट फुटला तेव्हा सदा सरवणकर सुद्धा यांनी गुपचूप आसाम गाठलं होतं. त्यानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी दादर मध्ये बाईक रॅली काढताच आमदार सदा सरवणकर यांचे नगरसेवक पुत्र समाधान सरवणकर हे लपून बसले होते. मात्र गणपती विसर्जनावेळी मात्र गर्दीत डायलॉगबाजी करताना दिसले होते. त्यात त्यांनी माईकवर थेट म्याव-म्याव करत जाहीर बालिशपणा दाखवला होता. त्यावेळी शिवसैनिकांनी सगळं शांतीत घेतलं, पण रात्री उशिरा शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांना शाखेत घुसून चोप दिला. तशी तक्रार स्वतः शिंदे गटातील पदाधिकाऱ्यांनी पोलीस स्थानकात केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page