गणेश नागरी पतसंस्थेत २ कोटींचा गैरव्यवहार
अध्यक्षांसह संचालकांवर गुन्हे दाखल

जेजुरी, दि. २१ येथील गणेश नागरी सहकारी पतसंसंस्थेत २ कोटी १३ लाख ६६ हजार १७ रुपयांचा गैरव्यवहार व आर्थिक अपहार केल्याची फिर्याद पुणे विभागाचे विभागीय सहनिबंधक कार्यालयीन लेखापरीक्षक श्रेणी २ चे ईरण्णा चंद्रकांत सावळगी यांनी जेजुरी पोलीस ठाण्यात दिली. फिर्यादीनुसार संस्थेचे अध्यक्ष व संचालक मंडळ, व्यवस्थापक, कर्जदार आदिंनी संगनमताने सभासद
खातेदार, ठेवीदारांचा विश्वासघात करीत मोठा आर्थिक गैरव्यवहार व अपहार केला असून त्यांच्यावर विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.
विभागीय सहनिबंधक यांच्या फिर्यादीनुसार या पतसंस्थेचे अध्यक्ष नरेंद्र बाबुराव जगताप, सचिव छाया यशवंत पवार, खासगी लेखा परीक्षक यशवंत बबन पवार, व्यवस्थापक अश्विनी सुरेश धुमाळ तसेच संचालक, कर्मचारी शरद दत्तात्रय शेळके, ज्ञानेश्वर जयवंत मांढरे, विजय वसंत दरेकर, विश्वनाथ कृष्णा पवार, गणेश चंद्रकांत पवार, नवनाथ एकनाथ पवार, संदीप शंकर दुर्गाडे, दत्तात्र्यय अण्णासाहेब राणे, सुरेश कृष्णाजी धुमाळ, संदीप एकनाथ पवार, सचिन रामचंद्र दुर्गाड़े, महादेव श्रीपती शेडगे, खासगी लेखापरीक्षक अमीर रशीदभाई बागवान, सुरेश रामचंद्र शिंगटे, आणि शिवाजी ज्ञानेश्वर घारे या १९ जनावर आर्थिक फसवणूक व अपहाराचा ठपका ठेवण्यात आला आहे.
वरील सर्व आरोपींनी संस्थेच्या हितात बाधा आणत संस्थेच्या सभासदांची, खातेदार, कर्जदार, ठेवीदार यांची मोठी फसवणूक केली आहे.

संस्थेचे अध्यक्ष व संचालकांनी गैरहेतूने, कटकारस्थान करून खोटे, बनावट ठराव करणे, खोटी कर्जप्रकरणे दाखवणे, खोटे व बनावट लेखा परीक्षण करून शासनाची फसवणूक करणे, राष्ट्रीयकृत बँकेची फसवणुक करणे, रोजकिर्द मध्ये खोट्या व बनावट नोंदी करणे, ठेवीदारांच्या खोट्या नोंदी करून फसवणूक करणे आदी गुन्ह्यांतर्गत विभागीय लेखपरिक्षकांनी जेजुरी पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page