गणेशोत्सवात सासवडला हाणामारी, पोलिसांकडून गुन्हा दाखल
सासवड, दि.१० (प्रतिनिधी) सासवड येथे काल गणपती विसर्जनादरम्यान फिर्यादी ऋशीकेश अर्जुन बांदल वय 32 वर्शे व्यवसाय शेती रा. म्हेत्रेपार्क साई पॅलेस सासवड यांना धारदार शस्त्राने, बॅटने, काठीने, लाथाबुक्यांनी मारहान केली. शिवीगाळ दमदाटी केली. असल्या प्रकरणी संशयित आरोपी कौशिक राजेंद्र जगताप याने कोणालातरी फोन लावुन त्याचे सांगणे वरून त्याचे साथीदार गौरव दिलीप जगताप, ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे, सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप, पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप, कुनाल उर्फ नन्या दशरथ जगताप व त्याचे इतर 5 ते 6 सहकारी यांच्या विरोधात सासवड पोलिस स्टेशनला भा वि का कलम 307, 143, 147, 148, 149, 504, 506, 427 या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.
सासवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार हकीकत – सासवड गावचे हददीत जगताप आळी येथे श्री. छत्रपती गणेश उत्सव मंडळ आहे. आमचे गणपती मंडळास थडयावरचा गणपती असे म्हणतात. यावर्षी थडयाचे गणपती मंडळाचा अध्यक्ष माझे मामाचा मुलगा मयुर विलास जगताप हा आहे.
काल ता.09/09/2022 रोजी आमचे मंडळाचे गणपतीची विसर्जनाची मिरवणुक होती. मंडळाचे विसर्जनाची मिरवणुक सायंकाळी 7ः00 वा. चालु झाली. रात्री 9ः00 वा चे सुमारास मंडळाची मिरवणुक हुंडेकरी चौक सासवड येथे आली. तेव्हा मंडळाचे अध्यक्ष मयुर जगताप हे मंडळामधील कार्यकर्त्यांना मिरवणुक पुढे घेण्यासाठी पुढे चला असे सांगत होते.
त्यावेळी 1) गौरव दिलीप जगताप 2) कौशिक उर्फ आबा राजेंद्र जगताप 3) ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे 4) सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप 5) पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप 6) कुनाल उर्फ नन्या दशरथ जगताप सर्व रा. सासवड ता. पुरंदर जि. पुणे यांनी अध्यक्ष मयुर जगताप यांचेशी विनाकारण वाद घालुन त्यांना धक्का बुक्की केली.
त्यावेळी अध्यक्षांचे भाउ विक्रम उर्फ विकी विलास जगताप हे तेथे होते. त्यांनी त्यांना समजावुन सांगितले. माझे काही ऐकायचे नसेल तर मी मिरवणुकीतुन निघुन जातो असे म्हणुन अध्यक्ष मयुर जगताप त्यांचे वेरा लाॅजींग येथे निघुन गेले. त्यावेळी गौरव व कौशिक यांनी कोणालातरी फोन लावुन समोरील व्यक्तीला फोनवर झालेली घटना सांगितली. समोरील व्यक्ती त्यांना काहीतरी सुचना देत होता.
वरील घटना झाली त्यावेळी तेथे अर्जुन जगताप, गौरव देशमुख संकेत जगताप, करण जगताप, आकाश फडतरे, हे पण होते. त्यानंतर मी व अर्जुन जगताप व विक्रम जगताप असे वेरा लाॅजींग येथे गेलो. त्यावेळी विक्रम जगताप याचे मोबाईलवर अतुल अशोक जगताप याचा फोन आला. त्याने विक्रम याला ”भांडणे मिटवायची आहेत का, कसे?
“असे म्हणुन त्याला कौशिक जगताप याचे नाईकवाडा येथील सिध्देश्वर वखार समोरील आॅफिसवर बोलावले. आम्ही रात्री 10ः00 वा चे सुमारास भांडणे मिटवा मिटवीचे उददेशाने मी, विक्रम जगताप, अर्जुन जगताप असे तिघे कौशिक जगताप याचे आॅफिसवर गेलो. त्याठीकाणी
1) गौरव दिलीप जगताप 2) कौशिक राजेंद्र जगताप 3) ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे 4) सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप 5) पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप 6) कुनाल उर्फ नन्या दशरथ जगताप व इतर 5 ते 6 मुले होती. आम्ही तेथे पोहचताच सागर उर्फ गणेश जगताप, कौशिक जगताप, ओंकार फडतरे यांनी विक्रम जगताप याला ”तुझा भाउ मयुर कसला अध्यक्ष, तुमची अध्यक्ष व्हायची लायकी नाही,
तुला आणि तुझ्या भावाला लय माज आलाय, आज तुमचे पैकी एकाला खल्लास करून टाकतो“ असे म्हणुन वरील सर्वानी आम्हाला मारहान करण्यास सुरूवात केली. ओंकार फडतरे याने कसल्यातरी धारदार शस्त्राने विक्रम जगताप याचे डोक्यात वार केले. गौरव जगताप, कौशिक जगताप यांनी बॅटने, सागर जगताप, पुष्कर जगताप, कुनाल जगताप यांनी काठीने, व इतरांनी हाता लाथाबुक्यांनी आम्हाला मारहान केली. आम्ही आरडाओरडा केला असता तेथे आजुबाजुचे लोक जमा झाले.
लोक जमा झाल्याचे पाहुन ते सर्व तेथुन दुचाकी व चारचाकी वाहनातुन पळुन गेले. विक्रम जगतापचे डोक्यात वार झाल्याने रक्त स्त्राव होवून जखमी अवस्थेत पडला होता. रस्त्याने जाणा-या गाडीला थांबवून आम्ही त्यास प्रथम चिंतामणी हाॅस्पीटल येथे उपचार कामी आनले. तेथील डाॅक्टरांनी प्राथमीक उपचार करून त्यास नोबोल हाॅस्पीटल पुणे येथे रेफर केले. सध्या तेथे त्याचेवर औषध उपचार चालु आहेत.
विक्रम याचेवर चिंतामणी हाॅस्पीटल सासवड येथे उपचार चालु असताना माझी मामी सौ.विमल विलास जगताप हिने मला फोन करून सांगितले की, हुंडेकरी चौकात वादावादी झालेनंतर
1) गौरव दिलीप जगताप 2) कौशिक राजेंद्र जगताप 3) ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे 4) सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप 5) पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप 6) कुनाल उर्फ नन्या दषरथ जगताप हे मामाचे घरी आले होते. त्यांनी तुमची मुल मयुर आणि विकी कोठे आहेत. त्यांना आज संपवतोच असे म्हणुन घरासमोर आरडा ओरडा केला.
माझे मामी ने व आईने त्यांना काय झाले असे विचारले असता त्यांनापण अश्लील शिवीगाळ करून बाहेर उभी असलेली ईनिव्हा कार नं. एम.एच.12 पी.टी.6665 या गाडीचे पाठीमागील काचेवर दगड टाकुन नूकसान करून दहशत निर्माण केली.त्यावेळी कौशिक जगताप कोणालातरी फोन करून गाडी फोडल्याचे सांगत होता.
तरी ता.09/09/2022 रोजी 9ः00 वा चे सुमारास मौजे सासवड ता.पुरंदर जि.पुणे गावचे हददीत हुडेकरी चौक येथे गणपतीच्या मिरवणुकीत पुढे चला असे म्हणाल्याचे कारणावरून
1) कौशिक राजेंद्र जगताप याने कोणालातरी फोन लावुन त्याचे सांगणे वरून त्याचे साथीदार 2) गौरव दिलीप जगताप 3) ओंकार उर्फ हॅंगर दयानंद फडतरे 4) सागर उर्फ गणेश डर्फ डेपो बाळासाहेब जगताप 5) पुष्कर उर्फ गोप्या सुनिल जगताप 6) कुनाल उर्फ नन्या दशरथ जगताप व त्याचे इतर 5 ते 6 सहकारी यांनी रात्री 10ः00 वा चे सुमारास सासवड येथील सिध्देश्वर वखार समोरील
कौशिक जगताप याचे आॅफिसवर मामाचा मुलगा विक्रम जगताप याला जिवे मारण्याचे उददेशाने धारदार शस्त्राने, बॅटने,काठीने,लाथाबुक्यांनी मारहान केली. शिवीगाळ दमदाटी केली. माझे आईला व मामीला अश्लील शिवीगाळ करून मामाचे घरा बाहेर उभी असलेली ईनिव्हा कार नं. एम.एच.12 पी.टी.6665 या गाडीचे पाठीमागील काच फोडुन नुकसान केले.
तुमचा मुलगा मयुर व विकी यांना आज संपवतोच असे म्हणुन जिवे ठार मारण्याची उददेशाने धमकी दिली म्हणून माझी त्यांचे विरूध्द तक्रार आहे पुढील तपास सासर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक विनय झिंजुर्के हे करीत आहे