खा.सुप्रिया सुळे यांनी घेतले खंडेरायाचे दर्शन..
जेजुरी, दि.६ बारामती लोकसभा मतदार संघाच्या खा.सुप्रिया सुळे यांनी आज जेजुरी गडावर जाऊन कुलदैवत खंडेरायाचे दर्शन घेतले.त्याचबरोबर त्यांनी जेजुरी गडावर सुरू असलेल्या विकास कामांची ही माहिती घेतली.
खा.सुळे यांनी आज दुपारी जेजुरी गडावर खंडेरायाच्या दर्शनाला आल्या होत्या. यावेळी त्यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्याअंर्गत सुरू असलेल्या पहिल्या टप्प्यातील विकास कामांची पाहणी केली. ठेकेदार सचिन चव्हाण आणि प्रमोद चव्हाण यांनी याबाबत त्यांना माहिती दिली. सुरू असणारे काम आणि यानंतर होणारी विकासकामे यांचाही त्यांनी यावेळी आढावा घेतला.
सुरू असलेल्या कामाबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले
राष्ट्रवादी कॉंग्रेसपक्ष फुटूबाबत केंद्रीय निवडणूक आयोगापुढे सुरू असलेल्या सुनावणीबाबत त्यांनी केवळ सत्यमेवजयते अशा एकाच शब्दात प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
दिल्लीतील अदृश्य शक्ती ने देवेंद्र फडणवीस यांचे खच्चीकरं सुरू केले आहे.तर दुसरीकडे महाराष्ट्राचा खेळ खंडोबा चालवला आहे.सातत्याने त्यांनी महाराष्ट्राचा अपमान चालवला आहे. पक्ष फोडण्यासाठी खोकी आहेत मात्र सर्वसामान्यांसाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत महाराष्ट्राला सातत्याने त्रास देणारी दिल्लीतील अदृश्य शक्तीचे हे एक गोलमाल असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
खा.सुळे यांचे जेजुरी गडावर मार्तंड देव संस्थान चे विश्वस्त मंगेश घोणे यांनी स्वागत केले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.