खानवडी येथे १५ वे राज्यस्तरीय महात्मा फुले साहित्य संमेलन संपन्न…
महिलांना कर्तृत्वसंपन्न बनविण्याचे काम महात्मा फुल्यांनी केले- अविनाश ठाकरे
जेजुरी दि.२७ ( प्रतिनिधी ) अंधारात चाचपडणाऱ्या बहुजन समाजाला शिक्षणाच्या माध्यमातून प्रकाश देत गुलामगिरीतून बाहेर काढण्याचे महान कार्य फुले दाम्पत्याने केले.तसेच स्त्री आणि पुरुष या दोन जाती असून मानवता हा एक धर्म असल्याचे सांगत महात्मा फुले यांनी महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून कर्तृत्वसंपन्न बनविण्याचे काम केले महात्मा फुले यांनी केले असे प्रतिपादन महात्मा फुले साहित्य संमेलनाचे अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केले.
खानवडी ( ता पुरंदर) येथे महात्मा फुले स्मारकातील महात्मा फुले यांच्या पुतळ्यास मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर संमेलनस्थळी दीपप्रज्वलन करून संमेलनाचे उद्घाटन करण्यात आले यावेळी झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अविनाश ठाकरे हे होते.
अध्यक्ष कॅड. शिवाजी कोलते, निमंत्रक सुनील
धिवार व गणेशशेठ जगताप होते.
कार्यक्रमाला आमदार संजय जगताप, जि.प. दत्तात्रय झुरंगे , महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गणेश जगताप, अतिरिक्त आयुक्त डाॅ. धनंजय परकाळे, गौरव कोलते, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष उत्तम कामठे, तालुकाध्यक्ष संदिप बनकर,अभिनेत्री सायली पराडकर , पल्लवी शितोळे ,सुप्रिया बरकडे सिने दिग्दर्शक,रमेश चौधरी,मंजिरी यशवंत, नवनाथ ढमे ,किरण म्हेत्रे, किशोर वचकल,अमोल भोसले,विजय तुपे ,आंबा भोंगळे,सुनील लढणे,अमोल बेलसरे
आदी मान्यवर उपस्थित होते.
साहित्य संमेलनाचे नियोजन ज्येष्ठ साहित्यिक दशरथ यादव, राजाभाऊ जगताप नंदकुमार दिवसे, दत्तानाना भोंगळे, सुनील लोणकर,शामकुमार मेमाणे, संजय सोनवणे ,रविंद्र फुले,रमेश बोरावके,श्रीराज खेनट,दत्ता होले,शिवाजी झुरंगे,संतोष डुबल,दिपक पवार,आनंदा बारवकर,आलिम सय्यद,दिनेश पवार आदीसह साहित्य संमेलनाच्या पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी केले.
महात्मा फुले प्रबोधन मराठी साहित्य संमेलनाचे हे पंधरावे वर्ष असून फुलांच्या विचाराचा जागर या संमेलनात केला जातो असे दशरथ यादव यांनी सांगितले.
यावेळी दिनकर काकडे यांच्या सत्य स्वरूप सगुनाबाई क्षीरसागर या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्तविक सुनील लोणकर यांनी केले.सुञसंचालन यांनी केले.आभार शामकुमार मेमाणे यांनी मानले.