खळबळजनक… सासवड न्यायालयात विषारी औषध पिऊन शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न..
सासवड, दि.२७ ( प्रतिनिधी ) सासवड न्यायालयामध्ये घडलेल्या एका धक्कादायक प्रकारामुळे पुरंदर त न्यायालयीन परिसरात तसेच तालुक्यात खळबळ माजली आहे. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे एकच गोंधळ उडाला आहे.
आज (दि.२७) रोजी बबन भैरू आगिवले रा. बांदलवाडी, गराडे यांनी सासवड न्यायालयात भर कोर्टात न्यायदेवतेसमोरच कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना घडली असल्याची माहिती पीडित बबन आगिलवे यांचे वकिल अँड.भास्कर जगदाळे यांनी प्रसार माध्यमांना दिली आहे.
अँड.भास्कर जगदाळे यांनी दिलेल्या सविस्तर माहितीनुसार बबन आगिवले यांनी सन २०१३ मध्ये भोरे नावाचे इसमाला खरेदी खतांनी दिली आणि त्या खरेदी खतामध्ये अंदाजे १ कोटी २६ लाखाचा व्यवहार करण्यात आला.
व्यवहारातील काही रक्कम बबन यांना दिली गेली. या व्यवहारातीलच ९६ लाख रुपयांचे धनादेश बबनला दिले गेले. खरेदीदार भोरे याने इतर रक्कमेबाबत चालढकल सुरू केली. दिलेले धनादेश बबन यांना आज टाकू नको उद्या टाक, आज नको उद्या असे करीत टाळाटाळ केले. काहीतरी कारणे सांगून धनादेश टाकण्यास मज्जाव केला आणि शेवटी ते धनादेश बाउंस झाले.
सदर खरेदी खतामध्ये मध्ये २०१३ साली नमुद केलेली सुमारे ९६ लाख रुपये ही रक्कम बबन आगिवले यांना आज पर्यंत मिळालेली नाही त्यानंतर बबन यांनी पाच सहा वर्ष अनेक प्रयत्न केले परंतु त्यांना सदर व्यवहारातील रक्कम ही मिळाली नाही तसेच या व्यवहारातील मध्यस्थांना बरोबर घेऊन बबन यांनी हा व्यवहार पूर्ण करण्याचा प्रयत्न केला परंतु संबंधित भोरे नावाच्या इसमाने केवळ खरेदीखत केलं खरेदी करून हा व्यक्ती थांबला नाही तर महसूल अधिकाऱ्यांना हाताशी धरून त्याने त्याचं नाव सातबारा उताऱ्यावर आणलं आणि सातबारा उताऱ्यावर आल्यानंतर तो ही जमीन हडप करण्याचा विचारात आहे.
सदर सर्व प्रकरणाबाबत सासवड येथील दिवाणी न्यायालयांमध्ये दावा दाखल असुन याबाबत न्यायालयीन प्रक्रिया चालू आहे त्याचा जो काही निकाल लागेल तो कोर्टात लागेलच परंतु दिवाणी दावा किंवा मेहरबान कोर्टामध्ये प्रकरण चालवुन याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळेल की नाही ?अशी शंका बबन यांना वाटल्यामुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असल्याचे त्यांचे वकील अड्. भास्कर जगदाळे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
बबन आगिवले हे एकुलते एक आहेत त्यांच्या सोबत पत्नी, एक मुलगा, एक मुलगी व बहिणी आहेत हा सर्व मोठा परिवार आहे परंतु सर्वच बाजूने वेढल्यामुळे शेवटी आत्महत्या करण्याचे टोकाचं पाऊल उचलाव लागल्याची सर्वत्र चर्चा आहे.
सासवड न्यायालयाकडून या घटनेची माहिती सासवड पोलिसांना देण्यात आल्यानंतर सदर व्यक्तीला सासवड येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.