खळद ग्रामपंचायतच्या वतीने पंचदिन महापैठणी महोत्सव..
खळद, दि. ८ खळद (ता.पुरंदर) येथे ग्रामपंचायतीच्या वतीने नागरिकांचा गणेशोत्सवातील आनंद द्विगुणित करण्याच्या हेतूने ०३ सप्टेंबर ते ०७ सप्टेंबर या कालावधीमध्ये पंचदिन महापैठणी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याला येथील महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
गेले दोन वर्षापासून कोरोनामुळे सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करताना अनेक मर्यादा येत होत्या,मात्र यावर्षी सर्वत्र मोठ्या उत्साहात गणेशोत्सव साजरा होत असताना या उत्सवाच्या निमित्ताने जास्तीत जास्त महिलांनी एकत्रित यावे,त्यांच्या विविध खेळ व्हावेत या हेतूने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या माध्यमातून संपूर्ण गावांमध्ये गावठाण व वाडी वस्तीवर ज्या ठिकाणी सार्वजनिक गणेशाची स्थापना करण्यात आली आहे या सर्व मंडळामध्ये या पाच दिवसांमध्ये ग्रामपंचायतीच्या सर्व पदाधिका-यांनी जाऊन त्या ठिकाणी महिलांसाठी विविध खेळाचे आयोजन केले व यातील विजेत्या महिलेला आकर्षक पैठणी भेट दिली. हा अभिनव उपक्रम ग्रामपंचायतने प्रथमच या वर्षी राबवला असल्याने याचे सर्व स्तरातून उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आले व याला महिलांनीही भरभरून दाद दिली.
या उपक्रमावेळी सरपंच दशरथ कादबाने, उपसरपंच आशा रासकर,माजी सरपंच कैलास कामथे,छाया कामथे,रोहीणी कामथे,नम्रता कादबाने,शारदा कामथे,भाऊसाहेब कामथे, योगेश कामथे,संदीप यादव, सुरेश रासकर, विकास कादबाने,योगेश वि. कामथे आदी सहभागी झाले होते. तर आरती आबनावे व सुरेश जगताप यांचे ही या उपक्रमास सहकार्य लाभले.
विजेत्या महिला खालील प्रमाणे.
१) भवानी माता मित्र मंडळ कादबाने मळा : प्रगती कुलदीप मेमाणे.
२) शिवमणी तरुण मंडळ रखमाजीची वाडी : प्रियंका संताजी रासकर.
३) जय मल्हार तरुण मंडळ खंडोबाची वाडी : स्वाती विकास कामथे.
४)सावतामाळी तरूण मंडळ रासकर मळा : सारीका प्रकाश रासकर.
५) विघ्नहर तरूण मंडळ दुकानदार वस्ती : संगिता किसन रासकर.
६) श्री सावतामाळी युवा प्रतिष्ठान काळुबाईचा मळा : पुनम चेतन रासकर.
७) संगमेश्वर तरुण मित्र मंडळ चव्हाणवस्ती: निकिता अविनाश गद्रे.
८) बापदेव मित्र मंडळ बापदेव मळा : सृष्टी कैलास कामथे
९)शिवशंभो- जय भवानी तरूण मंडळ : मंजुश्री विजय खळदकर
१०)संत सेना तरूण मंडळ : अश्विनी अजित खळदकर
११)भैरवनाथ मित्र मंडळ : गंगा शिवानंद बहीरगौंड
तर गोटेमाळ, पाणी पंचायत, घोडकेमळा व अन्य ठिकाणी ही या स्पर्धेचे आयोजन होणार असल्याचे पदाधिका-यांनी सांगितले.