क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांची २३१ वी जयंती जेजुरी गडावर साजरी
जेजुरी ,दि.७ आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक यांची २३१ वी जयंती जेजुरी गडावर मध्यावर उमाजी राजे नाईक यांच्या पुतळ्याला श्री मार्तंड देवस्थानचे विश्वस्त संदीप जगताप यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व भंडारा ची उधळण करून करण्यात आली .
यावेळी विश्व हिंदू परिषदचे राजाभाऊ चौधरी , भाजपचे शहर अध्यक्ष सचिन पेशवे ,कार्याध्यक्ष गणेश भोसले ,पुणे जिल्हा वंदे मातरम संघटनचे अध्यक्ष झहीर मुलाणी,आय एस एम टी कामगार संघटनेचड जगन्नाथ बरकडे, तसेच सामाजिक कार्यकर्ते, रजाक तांबोळी, अँड गणेश लेंडे , नितीन पुरोहित,बहुजन हक्क परिषदेचे शहराध्यक्ष यशवंत दोडके ,सचिन शिंदे , सुंदरतात्या खोमणे ,संतोष खोमणे आदींनी आद्य क्रांतिवीर उमाजी राजे नाईक पुतळ्यास पुष्पवृष्टी करुन मानवंदना दिली .
आरुष शैलेश राऊत यांनी उमाजी राजे नाईक यांच्यावर व्याख्यान दिले.कार्येक्रमाचे प्रस्ताविक उपाध्यक्ष पोपटराव खोमणे युथ फाऊंडेशन यांनी केले सूत्रसंचालन रवींद्र खोमणे यांनी केले या कार्यक्रमाला माऊली खोमणे यांनी आभार मानले .