कोथळे येथे साकारणार देवराई,
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त संकल्प
जेजुरी, दि.१४ पाणी पंचायत खळद व ग्रामपंचायत कोथळे यांच्या संयुक्त विद्यमाने कोथळे ग्रामपंचायत हद्दीत सुमारे २२ एकर क्षेत्रात वनराई साकार होत असून स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने या क्षेत्रात कोथळे हायस्कुलच्या २५० विद्यार्थ्यांच्या मदतीने १००० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले. या वृक्षाच्या संगोपनाची जवाबदारी कोथळे ग्रामपंचायतीने घेतली आहे
कोथळे ग्रामपंचायतीच्या हद्दीत जगतापवस्ती जवळील २२ एकर जागेवर कंपाउंड करून ठिबकच्या सहाय्याने या वृक्षांचे संगोपन केले जाणार आहे. याठिकाणी विविध वृक्षांचे लागवड करून देवराई करण्याचा मानस यावेळी सरपंच शहाजी जगताप यांनी व्यक्त केला .
याप्रसंगी गावात ग्रामपंचायतीचे सरपंच शहाजी जगताप,ग्रा.पं. सदस्य अभिजित जगताप,श्री मल्हार शिक्षण मंडळ कोथळेचे संचालक शामकांत जगताप,माजी ग्रा.पं.सदस्य दत्तात्रय भोईटे,रामदास जगताप,किशोर जगताप,ग्रामसेवक रवींद्र पिसे, पाणी पंचायतचे प्रतिनिधी योगेश मगर,अब्दुल पानसरे,विद्या महामंडळ प्रशाला कोथळेचे मुख्याध्यापक एकनाथ देवकर व शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.