कोथळेत प्राथमिक शाळेतील शिक्षकांनी चित्रकलेच्या माध्यमातून साकारली वारली संस्कृती…. जिल्हा परिषदेच्या कोथळे शाळेचे बदलले रूपडे….
जेजुरी, ( प्रतिनिधी ) शाळेचा परिसर सुशोभित तसेच विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक वातावरण निर्माण होण्याच्या दृष्टीने शाळेच्या वरांड्यात त्याचबरोबर शाळेच्या भिंतींवर शिक्षकांनी स्वतःच चित्रकलेचा वापर करीत साकारली वारली संस्कृती.
पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात गेल्या काही दिवसांपासून आलेले इंग्रजी माध्यमातील शाळा प्रवेशांचा कल यंदा बदललेला आहे चालू शैक्षणिक वर्षात( २०२२/२३) ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमधील तब्बल एख हजार नऊशे पांचेचाळीस(१९४५ )विद्यार्थ्यांनी आपल्या इंग्रजी शाळेचा निरोप घेतला आहे. हे विद्यार्थी आपल्या गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेकडे वळाले आहेत .पुरंदर तालुक्यामध्ये १२५ विद्यार्थी जिल्हा परिषदेतल्या शाळेत दाखल झाले आहेत.
शाळांच्या गुणवत्ते सोबत आता भौतिक सुविधा व शाळेचे सुशोभीकरण तसेच शाळा आकर्षण करण्यावर जिल्हा परिषदेच्या शाळा पुढे सरसावल्या आहेत .पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळे(केंद्र -धालेवाडी) आता आपले रूपडे बदलत असल्याचे चित्र आहे. या शाळेत एकूण ६० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत . त्याचबरोबर शाळेचे मुख्याध्यापक गोविंद लाखे सहशिक्षक विकास भोसले हे शिक्षक ज्ञानदानाचे कार्य करत आहेत. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत कोथळे, पालक व शिक्षण प्रेमी ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे शाळा डिजिटल होण्याकडे वाटचाल करीत आहे.
शासकीय यंत्रणा सर्व अधिकारी ,पदाधिकारी यांचे मार्गदर्शन होत असल्याने शिक्षकांना देखील कामात हुरूप येत आहे. शाळेची सुसज्य इमारत ,संरक्षण भिंत, शाळेत विज ,पाणी ,शौचालय ,संगणक कक्ष ,डिजिटल टीव्ही ,विद्यार्थ्यांसाठी वाचनालय, शाळेसमोर आकर्षक बाग, मुलांसाठी विविध खेळण्याचे साहित्य, शाळेसमोर मोठे मैदान असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ते बरोबरच सर्वांगीण विकास होण्यास याचा बहुमोल उपयोग होत आहे .विद्यार्थ्यांना विविध संस्कृती व परंपरेची माहिती व्हावी यासाठी शिक्षकांनी स्वतः हातात ब्रश, रंग घेऊन वारली संस्कृतीची चित्रे साकारली आहेत. आदिम काळापासून मानवाने कलांना आपलंस केल आहे .कलेच्या माध्यमातून त्यांनी आपली संस्कृती,रूढी परंपरा, जीवनशैली ,धार्मिक सण ,उत्सव ,लग्न सोहळे याचे दर्शन या कलेच्या माध्यमातून समाजमनावर कायम ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्रात प्रामुख्याने ठाणे, नाशिक ,पालघर ,जिल्ह्यातील तालासरी, डहाणू ,पालघर ,वसई वाडा, विक्रमगड जव्हार ,मोखाडा या भागात या आदिवासी वारली संस्कृतीचे चित्र पाहायला मिळते. वारली चित्रांचे रेखाटन त्यांच्या झोपडीची भिंत प्रामुख्याने झोपडीच्या दर्शनी भागात केले जाते. तराफेची सर्वाधिक चित्रे काढलेली असतात. चौकोनी, त्रिकोणी ,वर्तुळ या आकारांचा वापर करून त्या चित्रांचे सौंदर्य वाढवले जाते त्यात प्रामुख्याने प्राणी ,पक्षी ,बालके ,महिला पुरुष ,बैलगाडी व विविध संस्कृतीची संस्कृतीचा वापर केला असतो. वंशपरंपरेने ती सक्रात होत आली आहे .या चित्रातून कलावंतांची प्रतिभा निरीक्षण शक्ती कल्पकता दिसून येते.शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या हेतूने ही चित्रकला साकारली आहे.
शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अमर माने ,गटशिक्षणाधिकारी, चंद्रकांत उगले ,विस्ताराधिकारी पांडुरंग मेमाणे, केंद्रप्रमुख उज्वला नाझरेकर ,ग्रामपंचायत कोथळे, शाळा व्यवस्थापन समिती कोथळे, शिक्षणप्रेमी ग्रामस्थ, यांचे सहकार्य लाभले असल्याचे शिक्षकांनी सांगितले.
आपल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत मातृभाषेतून शिक्षण दिले जाते. त्यांचे समाज पूर्वक आकलन मुलांना होते. त्यामुळे गुणवत्तेबरोबर विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास होतो. त्यामुळेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता झपाट्याने वाढत आहे. आता इंग्रजी शाळेतील मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल होत आहेत.
– प्रमोद जगताप -अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती
जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकरी, कष्टकरी, गोरगरीब आर्थिक दृष्ट्या मागास ,यांचीच मुले शिक्षण घेतात असे नाही .तर समाजातील राजकीय सामाजिक आर्थिक दृष्ट्या सबल पालकांची मुले ही आता जिल्हा परिषदेचे शाळेत प्रवेश घेत आहेत. आमच्या गटातील जिल्हा परिषद सदस्य दत्तात्रय झुरंगे यांची मुले ही जिल्हा परिषदेच्या शाळेत शिक्षण घेत आहेत.
गोविंद लाखे- मुख्याध्यापक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोथळे