कॉंग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचे जेजुरीत स्वागत
जेजुरी, दि ११ पुणे जिल्हा कॉंग्रेसच्या वतीने आझादी गौरव पदयात्रेचे आयोजन करण्यात आले असून गुरुवार दि ११ रोजी सकाळी जेजुरी येथे या पदयात्रेचे आगमन झाले.जेजुरी शहर कॉंग्रेस ,जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षा व नगरसेवक तसेच कार्यकर्ते व व ग्रामस्थांनी या पदयात्रेचे स्वागत केले.
सकाळी साडे अकरा वाजतगाजत व तिरंगा फडकावीत या पदयात्रेचे मोरगावरोडला आगमन झाले. यावेळी भोर तालुक्याचे आमदार संग्राम थोपटे,पुरंदर हवेलीचे आमदार संजय जगताप,जिल्हा कॉंग्रेसच्या अध्यक्षा किरण काळभोर,सहप्रभारी उत्कर्षा रुपवते,कॉंग्रेसचे नेते दादूसाहेब खान,पुणे जिल्हा परिषदेचे सदस्य दत्तात्रय झुरंगे,पंचायत समितीच्या सदस्य सुनिता कोलते,तालुका कॉंग्रेसचे अध्यक्ष प्रदीप पोमण,व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
जेजुरी येथे डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून आझादी गौरव पदयात्रा काढण्यात आली. छत्रपती शिवाजीमहाराज चौकात जेजुरी नगरपालिकेच्या नगरध्यक्षा वीणा सोनवणे,कॉंग्रेसचे सर्व नगरसेवक तसेच माजी उपनगराध्यक्ष सदाशिव बारसुडे,सामाजिक कार्यकर्ते सुरेश उबाळे यांनी या पदयात्रेचे स्वागत केले.
यावेळी माजी सैनिक भाग्यवान म्हस्के,बबन झगडे,जयंत नाझीरकर यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त उत्कर्षा रुपवते यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक युवक काँग्रेसचे अध्यक्ष माऊली यादव तर आभार देवसंस्थानचे विश्वस्त पंकज निकुडे यांनी मानले.
जेजुरी शहर कॉंग्रेसचे अध्यक्ष सचिन सोनवणे,नगरसेवक अजिंक्य देशमुख,महेश दरेकर,गणेश शिंदे, सुरेश सातभाई,रुक्मिणी जगताप,युवकचे अध्यक्ष ईश्वर दरेकर,हेमंत सोनवणे व मोठ्या संख्येने कार्यकर्ते व ग्रामस्थ उपस्थित होते.