केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीताराम यांनी घेतले जेजुरीच्या खंडोबाचे दर्शन…
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घेतले खंडोबाचे दर्शन
जेजुरी, दि. २३केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी साडे नऊ वाजता जेजुरी गडावर जाऊन खंडेरायाचे दर्शन घेतले.
अर्थमंत्री सीतारामन काल पासून बारामती लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असून आज सकाळी साडे नऊ वाजता त्यांचे जेजुरी गडावर आगमन झाले. त्यांच्या सोबत माजी मंत्री विजय शिवतारे, हर्षवर्धन पाटील, अंकिता पाटील, दौडचे आ राहुल कुल, कांचन कुल, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष जालिंदर कामठे, राहुल शेवाळे, संगीताराजे जाधवराव निंबाळकर, सचिन पेशवे, आ.माधुरी मिसाळ, आ. बाळा भेगडे त्याचबरोबर स्थानिक भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते.
खंडेबाचे दर्शन घेऊन त्यांनी कुलधर्म कुळाचाराचे धार्मिक विधी ही उरकले.
गडकोटातील बालदारीत झालेल्या छोटेखानी समारंभात त्यांचे मार्तंड देवसंस्थान, पुजारी वर्गाकडून त्यांचे स्वागत करण्यात आले. पुजारी वर्गाकडून त्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात जआले
जुरी गडावर विविध संस्थांकडून केंद्रीय अर्थमंत्री सीतारामन यांचा सत्कार करण्यात येत होता. सीतारामन यांनी त्याला विरोध केला. २०२४ पर्यंत मला जे काही करावयाचे आहे त्यासाठी खंडेरायाचा मला आशीर्वाद मिळाला आहे.त्यापेक्षा मोठा कोणताच सत्कार मला नकोय.अशा शब्दात सत्कार करणाऱ्यांना त्यांनी फटकारले.