किरिट सोमय्यांचा तो व्हिडिओ खराच, आता तपास कोणी व्हायरल केला त्याची …
मुंबई .दि. २८ भाजप नेते किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हायरल व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यांच्यावर आणि भाजपवर मोठी टीका करण्यात आली होती. या प्रकरणी सोमय्यांवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी विरोधाकांकडून करण्यात येत होती. आता याच प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. व्हायरल झालेला तो आक्षेपार्ह व्हिडिओ किरीट सोमय्या यांचाच असल्याची माहिती गुन्हे शाखेतील सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार आता या प्रकरणात मुंबई पोलीस मोठे पाऊल उचलण्याच्या तयारीत असल्याचे सांगण्यात येत आहे.
भाजपचे नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या व्हायरल व्हिडीओ प्रकरणाचा तपास करणाऱ्या मुंबई पोलिसांच्या सूत्रांनी हा व्हिडीओ खरा असल्याचा दावा केला आहे. तपास पथकाकडून या व्हिडीओचे विश्लेषण करण्यात आले आहे. संबधित व्हिडिओ मॉर्फ केलेला नसून खरा असल्याचे आढळले आहे. मुंबई पोलीस आता हा व्हिडीओ व्हायरल कोणी केला याचा तपास करत आहेत. यासंबधीचे वृत्त एका वृत्तवाहिनीने दिले आहे
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ एका वृत्तवाहिनीने काही दिवसांपुर्वी प्रसिद्ध केला होता. त्यांच्या या व्हायरल व्हिडीओचा मुद्दा विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनातही मोठ्या प्रमाणावर चर्चेत आला होता. अधिवेशनातील गदारोळानंतर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले होते.
किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह व्हिडीओ काही दिवसांपुर्वी समोर आला होता. त्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. एका मराठी वृत्तवाहिनीने 17 जुलै रोजी रात्री यासंदर्भात वृत्त प्रसारीत केले होते. त्यानंतर विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी या घटनेनंतर किरीट सोमय्या यांच्यावर गंभीर आरोप केले होते. दानवे यांनी एक पेन ड्राईव्ह देखील उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्याकडे दिला होता. या संपुर्ण प्रकरणाची राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा केली होती.