कडेपठार पतसंस्थेच्या वतीने उद्योजक जोशी, भालेराव , खैरे हरपळे यांना पुरस्कार जाहीर

जेजुरी, दि २३ सामाजिक,कृषी,सहकार,व शैक्षणिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या कडेपठार बिगरशेती पतसंस्थेच्या वतीने यंदाच्या वर्षी उद्योजक रवींद्र जोशी, अड विजय भालेराव, जालिंदर खैरे व अमर हरपळे यांना विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती पतसंस्थेचे चेअरमन व पुरंदर तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष माणिक झेंडेपाटील यांनी दिली.
गेली २४ वर्षापासून कडेपठार पतसंस्था कार्यरत आहे. उत्कृष्ट सेवेबद्दल या पतसंस्थेला सातत्याने ऑडीट अ वर्ग प्राप्त झाला आहे. दरवर्षी विविध शाळांना पर्यावरण रक्षणासाठी वृक्षारोपण व वृक्षसंवर्धनासाठी ड्रीप योजना,शैक्षणिक साहित्य वाटप,विद्यार्थी गुणगौरव,दुष्काळीपरीस्थितीत जनावरांसाठी चारा छावणी, शेतकरी मेळावे, आरोग्य शिबिरे व गरजूंना वैद्यकीय मदत, तरुणांना उद्योग व्यावसायिक उभारणीसाठी कर्जपुरवठा आदी उपक्रम पतसंस्था राबवीत असल्याचे व्यवस्थापक अरविंद शेंडकर यांनी सांगितले. दि २५ ओगस्ट रोजी पतसंस्थेची २४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा असून यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या सामान्य व्यक्तींना पुरस्कार देवून गौरविण्यात येते.जेजुरी उद्योजक संघाचे कार्याध्यक्ष व जेजुरी पालिकेचे माजी नगरसेवक रवींद्र साधू जोशी यांना आदर्श उद्योजक, विधीक्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे अड विजय सोमनाथ भालेराव, प्रगतशील बागायतदार जालिंदर मारुती खैरे यांना कृषी रत्न, पतसंस्थेमध्ये उल्लेखनीय काम करणारे अमर बंडोपंत हरपळे यांना आदर्श कर्मचारी पुरस्काराने गौरविण्यात येणार असल्याचे चेअरमन माणिकराव झेंडे पाटील यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page