एक सही संतापाची मोहिमेला पुरंदर तालुक्यात मोठा प्रतिसाद …४५०० पेक्षा जास्त जाहीर स्वाक्षऱ्या…
जेजुरी,दि.१० महाराष्ट्रामध्ये तत्व ,विचार ,निष्ठा यांना मूठमाती देऊन स्वतःचा भ्रष्टाचार झाकण्यासाठी आणि स्वार्थी हेतू साध्य करण्यासाठी सत्ता भोगण्यासाठी युत्या होत आहेत.यामध्ये मतदारांचा विचार केला जात नाही. “आहे तेथेच आम्ही आहोत थांबलेलो ,तूर्तास चालण्याची चर्चाच छान आहे.” अशी सध्या अवस्था आहे.सध्याच्या राजकीय घडामोडींवर सर्वसामान्य जनतेच्या प्रतिक्रिया घेण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेश ,सूचनेनुसार “एक सही संतापाची ” ही मोहीम राज्यभर राबविण्यात येत आहे. पुरंदर तालुक्यामधील सासवड ,जेजुरी या ठिकाणी तीन दिवसांत सुमारे ४५००हुन अधिक मतदारांनी जाहीर स्वाक्षऱ्या करून राज ठाकरे यांच्या मोहिमेला प्रतिसाद दिला असल्याचे मनसे तालुकाध्यक्ष उमेश जगताप -देशमुख यांनी सांगितले.या उपक्रमात मनसेचे शंकर गावडे ,अविनाश बारभाई ,मोहन जगताप,किरण रोमन ,विक्रम जगताप,मयूर जाधव ,रोहन जगताप,आदी कार्यकर्ते सहभागी झाले होते.