इस्कॉनच्या वतीने जेजुरीत श्रीकृष्णजन्माष्टमी महोत्सव साजरा
जेजुरी, दि.२८ जेजुरी येथील संस्कृती भवनात इस्कॉनच्या वतीने श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कीर्तन ,प्रवचन,सांस्कृतिक कार्यक्रमाने वातावरण श्रीकृष्णमय झाले होते. या धार्मिक कार्यक्रमास दोन हजाराहून अधिक भाविकानी सहभागी झाले होते.
इस्कॉनच्या वतीने जेजुरी मध्ये दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्साहात साजरी केली जाते. या उत्सवाची सुरुवात हरीनाम सकीर्तनाने झाली. श्रीकृष्णाच्या भजना च्या तालावर लहान मुलांनी नृत्य सादर करून रसिकांची माने जिंकली. यावेळी लहान मुलांनी सादर केलेली मी आणि माझे मन हि नाटिका विशेष प्रभावी ठरली. मनुष्याचे मन कसे भरकटते , पापकृत्यात गुंतवीते ,मनावर नियंत्रण कसे मिळवावे या आशयाची हि नाटिका लहान मुलांनी सादर केली.
श्रीमान वृंदावन प्रभू यांनी आपल्या प्रवचनात भगवंताचा जन्म,भागवत धर्म,हिंदू धर्म शास्त्राविषयी भाविकांना मार्गदर्शन केले. सामाजिक कार्यकर्ते संतोष खोमणे यांच्यावतीने भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या धार्मिक कार्यक्रमाचे नियोजन जेजुरी इस्कॉन सेंटर व पुणे इस्कॉनचे सुंदरवरप्रभू,श्रीपाद महाप्रभू,आनंद गोपालप्रभू,श्वेतदीप प्रभू,वैकुंठ सुजनमाता,मनोज कुदळे प्रभू आदींनी केले
जेजुरी येथे इस्कॉन आयोजित श्रीकृष्णजन्माष्टमी निमित्त आयोजित सांस्कृतिक कार्यक्रमात लहान मुलांनी नृत्य करून रसिकांची मने जिंकली.